Nashik Malegaon Crime News : एखादे राज्य प्रगतिपथावर आहे किंवा नाही, हे कशाच्या आधारावर ठरवायचे? राज्याच्या वाढत्या उत्पनावरून, वस्तू उत्पादनाच्या प्रमाणावरून, वाढत्या इमारती वरून कि शिक्षणातील प्रगतीवरून? तर ह्या सगळ्या गोष्टी तर यात आल्याचं पण हे सगळं दुय्यम स्थानी असेल याहीपेक्षा महत्वाचं काही असेल तर ते एखाद्या राज्यात स्त्रिच स्थान कुठे आहे आपण स्त्रिला लक्ष्मी मानतो पण खरच आपल्या राज्यात खरच स्त्रीला लक्ष्मी मानतात का? अर्थात नाही. काही ठिकाणी मनात देखील असतील कदाचित त्या स्त्रिया जास्त नशीबवान असाव्यात. पण त्यांचं काय ज्यांना मान सोडाच किड्या मुंग्यांसारखं वागवलं जात. त्याचं लैगिक शोषण केलं जात. काहींना अत्याचारला सामोरे जावे लागते. महिलांना आपण काही काळ बाजूला ठेवुयात पण २-३ वर्षांची बाळ त्या बाळांना देखील या विकृतीला सामोरे जावे लागते. हे आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव. जी भूमी शिवरायांची भूमी म्हणून ओळखली जाते. जिथे स्त्रियांना चांगल्या दर्जाची वागणूक दिली जायची त्याच राज्यात आज अगदी ३ वर्षीय मुलीला देखील या हवसी प्रवृत्तीला सामोरे जावे लागते हे दुर्दैवच.
अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडली आहे. मालेगावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी गावातील २४ वर्षीय विजय संजय खैरनर या नराधमाने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर विकृतपणाने तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. इतकी विकृत प्रवृत्ती आपल्या राज्यात जन्माला आलीच कशी. स्त्रियांना उच्च सन्मान देण्याचे संस्कार असणाऱ्या आपल्या या राज्यात एवढी विकृती का वाढली? हि पहिली घटना नाही या आधी देखील अश्या अनेक घटना घडल्या आहेत. यावर ठोस पाऊले का उचली जात नाही. त्या चिमुरडीला अत्याचार या शब्दाचा अर्थ देखील माहिती नसेल अश्या या बाळाला अत्याचाराचा सामना करावा लागला? इतकं दुर्भाग्य का यावं एखाद्याच्या नशिबी.
या घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत. दरम्यान, पीडित मुलीचा मृतदेह जेव्हा तिच्या राहत्या घरी आण्यात आला, त्यावेळी एकच आक्रोश झाला.
नेमक प्रकरण काय ? (Nashik Malegaon Crime News)
प्राथमिक तपासात, असे समोर आले कि आरोपी विजय खैरनारचे मुलीच्या वडिलांसोबत भांडण झाले होते. जवळजवळ एक महिन्यांपूर्वी दोघांचे वाद झाले होते. त्याचा राग या आरोपीच्या मनात साठला होता. नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केले. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून न्यायालयाने आरोपील २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सदर प्रकरणी मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सदर केस ही फास्टट्रॅक कोर्टात नेऊन, सरकारी वकील उज्वल निकम यांना ही केस लढवण्याकरिता नेमलं जाईल, असं आश्वासन देखील दिल.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या भयंकर घटनेने सर्वत्र तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ लासलगाव येथील सुवर्णकार समाजाने मूक मोर्चा काढून आपला संताप देखील व्यक्त केला लासलगाव येथील शिवाजी चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढत सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन दिले होते. यावेळी आरोपीवर तातडीने फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरातील कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी महिलांनी केली. एका शुल्लक वादातून या २४ वर्षीय नराधमाने एका चिमुकलीचा जीव घेतला. या सगळ्या प्रकरणावर प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा –
Aishwarya Rai : धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं ते वक्तव्य वायरल, वाचा काय म्हणाली ऐश्वर्या राय









