Home / महाराष्ट्र / Nashik News : महापालिका निवडणुकीआधी नाशिक भाजपमध्ये वादळ; पक्षप्रवेशावरून उघड फूट

Nashik News : महापालिका निवडणुकीआधी नाशिक भाजपमध्ये वादळ; पक्षप्रवेशावरून उघड फूट

Nashik News : महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्याच्या राजकारणात वेगाने बदल होताना दिसत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी...

By: Team Navakal
Nashik News
Social + WhatsApp CTA

Nashik News : महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्याच्या राजकारणात वेगाने बदल होताना दिसत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्याच्या मालिका अद्याप तरी काही बंद झालेल्या नाहीत. दरम्यान नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या (Mahanagarpalika Election 2026) अनुषंगाने काही महत्त्वाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश देखील आज पार पडणार आहेत.

नाशिकमध्ये आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाचे नेते तसेच माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, आणि शाहू खैरे यांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे, तर या पक्षप्रवेशाला देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. यासगळ्यामुळे आता नाशिकमधील भाजपची अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर तसेच काँग्रेसच्या एका नेत्याचा आज भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे. मात्र या पक्षप्रवेशाना आता भाजपा मधूनच विरोध दर्शवल्याचे चित्र डोळ्यासमोर आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे (evyani Farande) यांनी या पक्षप्रवेशाबद्दल जाहीरपणे विरोध दर्शवला आहे.

फरांदे यांनी एक्सवर पोस्ट करत हा निषेद नोंदवला आहे. “प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध असल्याचे त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया द्वारे स्पष्ट केले. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी असल्याचे देखील त्या म्हणाल्या. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही”, असं देखील फरांदेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.(Mahanagarpalika Election 2026)

नाशिकमध्ये आज प्रभाग १३ मध्ये होणाऱ्या भाजप प्रवेशाला स्थानिक भाजप पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांकडून जोरदार विरोध दर्शवला जात आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी देखील या भाजपा प्रवेशाला विरोध दर्शवला आहे. ज्यांनी आजपर्यंत हिंदुत्वाच्या विरोधात सातत्याने भूमिका घेतल्या अश्या लोकांना लाल कार्पेट पक्ष देत असेल तर आम्ही तर इतके वर्ष निष्ठावंत म्हणून काम करत आहोत, तर आमच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही असा आमचा पक्षावर विश्वास असल्याचे म्हणत भाजप कार्यालयाच्या बाहेर या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे.

मनसे-शिवसेना युतीची घोषणा साजरी होताच एकमेकांना पेढे भरवणाऱ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश?
ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर भाजपने नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिल्याचे समोर येत आहे. ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर जल्लोष करणारे माजी महापौर विनायक पांडे हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. दोन्ही ठाकरेचे पदाधिकारी काल माध्यमांसमोर एकमेकांना पेढे भरवत होते, विनायक पांडे यांनी तर ठाकरे बंधू सरकारचा सुफडा साफ करणार आशा वल्गना देखील केल्या होत्या आणि आज तेच विनायक पांडे भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांच्या सुनेला अदिती पांडे ह्या भाजपकडून उमेदवारी मिळणार आहे.

तसेच मनसेचे पहिले महापौर आणि गेल्या काही वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत असणारे यतीन वाघ आणि काँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे हे देखील भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

Nashik News: विनायक पांडेंनी सांगितलं ठाकरेंची शिवसेना सोबत सोडण्याचे कारण…
या अचानक बदलेल्या भूमिके बद्दल विनायक पांडे यांनी अधिक स्पष्टता दिली आहे. ते म्हणतात मागच्या निवडणुकीत तिकिटाच्या वेळी माझ्या मुलाचे तिकीट कापले. आणि आता पुन्हा एकदा मुलाला तिकिटची मागणी केली होती. मुलाने मतदारसंघात कामही करायला सुरू केले, पण यंदा ही तिकीट कापले गेले. पण यावेळी आम्ही सूनबाईला निवडणुकीत उतरवत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. सुनेला भाजपमधून ही उमेदवारी देण्यात आली असल्याचे देखील ते म्हणाले.

पुढे ते म्हणतात आता आम्ही मनसे आणि शिवसेनेचा सुफडा साफ करणार आहोत. संजय राऊत यांच्यासोबत मी फोनवर याबाबत चर्चा केली होती. पण त्यांनी तिकीटाबाबतीत ठोस काहीच सांगितले नाही. उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत मधले नेते आम्हाला पोहचू देत नाहीत. माझी नाराजी कोणावरही नाही आहे. आम्ही संपूर्ण पॅनल तयार केला आहे, पॅनल निवडून येणार, त्यांना उमेदवार देखील मिळणार नाही, ठाकरे यांच्यावर नाराजी नाही स्थानिक पदाधिकारी यांच्याकडून सतत डावलले गेले होते, आताही तसेच होत होते, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे विनायक पांडेंनी पक्ष सोडताना स्पष्ट केले.

हे सर्व जण प्रभाग तेरा मधून इच्छुक असून पॅनल निवडून आणण्याच्या दृष्टीने भाजपचे सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहे. मात्र याच प्रभागातून शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे बबलू शेलार यांनी चार दिवसांपूर्वीच आमदार देवयानी फरांदे यांच्यां माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तिकिटच्या अपेक्षेनेच हा भाजप प्रवेश होता. यासह भाजपमधून इच्छुक असणारे देखील निवडणुकीची तयारी करत होते. मात्र आज भाजपमधेच आणखी प्रवेश होत असल्याने भाजपची डोकेदुखी कमालीची वाढणार आहे, त्यामुळे यावर भाजपा कसा तोडगा काढते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे देखील वाचा –  Electric Cars: डिझेल-पेट्रोलचे टेन्शन सोडा! 7 लाखांच्या बजेटमध्ये घरी न्या इलेक्ट्रिक कार; पाहा टॉप 3 स्वस्त पर्याय

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या