Home / महाराष्ट्र / Nashik Politics : तिकिट नाकारल्यामुळे १३ दिवसांत दोन पक्ष बदलले; नितीन भोसलेंनी कमळ सोडून धनुष्यबाण हाती घेतले..

Nashik Politics : तिकिट नाकारल्यामुळे १३ दिवसांत दोन पक्ष बदलले; नितीन भोसलेंनी कमळ सोडून धनुष्यबाण हाती घेतले..

Nashik Politics : नाशिकच्या राजकीय मैदानात पक्षांतराचा नवा धडाका उफाळून आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात...

By: Team Navakal
Nashik Politics
Social + WhatsApp CTA

Nashik Politics : नाशिकच्या राजकीय मैदानात पक्षांतराचा नवा धडाका उफाळून आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात सरकताना दिसत आहेत. याच दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी फक्त १३ दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र तिकीट मिळण्याची आशा पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

नितीन भोसले यांनी २५ डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश करून फक्त दहाच दिवस उलटले होते, त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना निवडणुकीत संधी न मिळाल्यामुळे त्यांनी शिवसेनेचा भगवा स्वीकारला आहे. भोसले यांचा हा अचानक पक्ष बदल नाशिकमधील राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.

भाजपने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारलेल्या माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी महापौर दशरथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्याच वेळी, महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये फक्त १३ दिवसापूर्वी प्रवेश केलेले माजी आमदार नितीन भोसले यांनीही शिवसेनेचा धनुष्यबाण स्वीकारला. या अचानक पक्षबदलामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे.

माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ आणि काँग्रेस नेते शाहू खैरे यांच्या सोबत नितीन भोसले यांनी २५ डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशाला भाजपच्या काही नेत्यांनी विरोध केला, पण आमदार गिरीश महाजन यांनी या सर्वांना पक्षात स्वीकारले. नंतर भाजपने शाहू खैरे, विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या कुटुंबीयांना निवडणुकीसाठी संधी दिली, मात्र प्रभाग क्रमांक १३ मधून नितीन भोसले यांच्या नातेवाईकांना उमेदवारी नाकारली गेली. या निर्णयामुळे भोसले यांनी फक्त दहा दिवसातच भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

जपमध्ये प्रवेश करूनही उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार नितीन भोसले यांनी काँग्रेस नेते शाहू खैरे यांच्यावर टीका केली आहे. भोसले यांच्या आरोपानुसार, प्रभाग क्रमांक १३ मध्ये पांडे, वाघ, खैरे आणि भोसले या चौघांना उमेदवारी मिळेल आणि त्यांचा पॅनल तयार होईल, असा आश्वासन प्रवेशावेळी दिला गेला होता. मात्र, नंतर उमेदवारीची यादी जाहीर झाली तेव्हा भोसले यांचे नाव त्यात नसल्याचे कळल्यावर त्यांना मोठा धक्का बसला.

भोसले यांनी स्पष्ट केले की, या यादीतील अपुऱ्या समावेशामुळे आणि त्यांनी अपेक्षित असलेली संधी न मिळाल्यामुळे शाहू खैरे यांच्याकडून ‘घात’ झाला असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांनी हेही म्हटले की, पक्षात प्रवेश करताना जे आश्वासन दिले गेले होते, त्याची पूर्तता न झाल्यामुळे त्यांना भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घ्यावा लागला.

या घटनांमुळे स्थानिक राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकीत पक्षांतर आणि आंतरिक संघर्षाचा प्रभाव मतदान परिणामावरही दिसून येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. भाजप आणि शिवसेना या दोन मुख्य पक्षांमध्ये प्रभाग क्रमांक १३ मध्ये स्पर्धा अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट झाल्या आहेत.

हे देखील वाचा – “जे जगात नाहीत, त्यांच्यावर टीका करणे चुकीचे”; विलासराव देशमुखांवरील वक्तव्यावरून ओवैसींनी रवींद्र चव्हाणांना सुनावले

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या