Nashik Tree Cutting : राज्यात आता निवडणुकीबरोबरच नाशिकमधील तपोवनाचा मुद्दा देखील जोरदार गाजताना दिसत आहे. नाशिकमध्ये मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela ) तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. पण इतक्या मोठ्या पवित्र गोष्टीवरून वाद सुरु होण हे दुर्देवीच. कुंभमेळा आणि वाद तसा फारसा कधीही संभंध आलाच नाही. दर बारा वर्षानी नाशिकमध्ये हा पवित्र कुंभमेळा भरतो, अर्थात पुढेही तो भरलेच.
तपोवन (Tapovan) परिसरातील प्रस्तावित साधूग्राम (Sadhugram) प्रकल्पामुळे १८०० झाडांची तोड (Tree Cutting) होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर मात्र राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तपोवन ही केवळ हिरवाईने नटलेली हिरवीगार भूमी नाही; त्या मातीवर पूर्वापार साधूंनी केलेले संस्कार आहेत. तिच्या मातीमध्ये इतिहास, श्रद्धा आणि पर्यावरणीय स्थैर्य ह्या सगळ्या गोष्टी अगदी खोलवर रुजल्या आहेत.
सगळ्यांचेच श्रद्धा स्थान असलेले प्रभू श्री राम सीता आई आणि लक्ष्मण रामायणकाळात यांनी आपल्या चौदा वर्षांच्या वनवासातील काही काळ याच तपोवन व्यतीत केला, असे रामायणकथेत सांगितले जाते. त्यामुळे ही भूमी धार्मिकदृष्ट्या अतिशय पवित्र, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशी मानली जाते. या स्थळातील प्राचीन झाड हि शेकडो वर्षांच्या अथक आणि अतिशय कष्टकरी प्रवासाची देखील साक्ष देतात.
साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी ११५० एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन सुरु आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार असल्याने राज्यात अस्वस्थता आहे. या निर्णयाचा नागरिक, पर्यावरणप्रेमी, स्थानिक संघटना तसेच अनेक सेलिब्रिटींनी देखील जोरदार विरोध केला आहे. अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde), शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे.
राज्यात कितीही राजकारण असेल तरी महाराष्ट्रातील सांस्कृतिक झाडे परंपरा टिकवण्यासाठी राज्यातील सगळे राजकारणी एकत्र आल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. कुंभमेळ्यासारख्या पवित्र अश्या ठिकाणी लाखो लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या धार्मिक सोहळ्यांसाठी व्यवस्था करण्याची गरज निश्चितच असते, परंतु ती व्यवस्था निसर्गाचा नाश करून नाही; तर निसर्गासोबत समन्वय साधत करायला हवी. या जगात अशक्य असे काहीच नाही त्यामुळे या पिढ्यान
पिढ्यान चालत आलेल्या वारसाला जपणे आपले कर्तव्य आहे त्यामुळे आता प्रकरणाला नवीन काय वळण मिळेल हे पहाणे महत्वपूर्ण ठरणार आहे.
हे देखील वाचा – FIFA Peace Prize : अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना शांतता पुरस्कार मिळालाच; कोणी केले सन्मानित? पाहा









