Home / महाराष्ट्र / Navale Bridge : नवले पूल नव्याने उभारणार; मंत्री उदय सामंतांची घोषणा

Navale Bridge : नवले पूल नव्याने उभारणार; मंत्री उदय सामंतांची घोषणा

Navale Bridge – पुण्यातील नवले पुलावर (Pune Navale Bridge)गुरुवार १३ नोव्हेंबर रोजी अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यात मराठी अभिनेता...

By: Team Navakal
Navale Bridge
Social + WhatsApp CTA

Navale Bridge – पुण्यातील नवले पुलावर (Pune Navale Bridge)गुरुवार १३ नोव्हेंबर रोजी अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यात मराठी अभिनेता धनंजय कोळी (Dhananjay Koli) याही आपल्या जीवाचा गमावला. या दुर्घटनेनंतर शहरात सुरक्षा उपाययोजनांची मागणी जोर धरत असताना उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नवले पूल नव्याने उभारण्याची घोषणा केली.

पाहणीदरम्यान मंत्री उदय सामंत यांच्यासोबत संबंधित विभागातील अधिकारी तसेच शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)उपस्थित होते. पुलाच्या रचनेतील त्रुटी, उतारामुळे होणारे अपघात तसेच वाहतूक नियोजन अशा विविध मुद्द्यांवर सामंत यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

या पाहणीनंतर सामंत म्हणाले की, नवले पुलावर अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना कराव्या लागतील. बोगद्याच्या पुढे उतार असल्याने वाहनांवरील नियंत्रण सुटते आणि अपघात होतात. त्यामुळे या संपूर्ण परिसराचा विकास दोन टप्प्यात करण्यात येईल.कात्रज चौक (Katraj Chowk)आणि नवले ब्रिज परिसरातील कामेही गतीने केली जातील. अपघात घडू नयेत म्हणून नव्या पद्धतीचा पूर्णपणे सुरक्षित असा नवीन नवले ब्रिज उभारण्यात (constructed) येईल.


हे देखील वाचा – 

नागपूरात दाट वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार, बिबट्याला पकडण्यासाठी पोलीस आणि वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन

 मुंबईत दिवसाढवळ्या खुणांचा थरार! कांदिवलीत बिल्डरवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या

१० वर्षांहून जुन्या वाहनांनाही फिटनेस टेस्ट द्यावी लागणार!

Web Title:
संबंधित बातम्या