Navi Mumbai : मनसे नेते अमित ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच नवी मुंबईत एक आंदोलन हाती घेतल होत त्यांनी ४ महिने धूळखात असलेला छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. अमित ठाकरे यांनी हा पुतळा पाण्याने स्वच्छ करत त्यावर हार घालत त्या पुतळ्याचे अभिवादन केले. यावरून अमित ठाकरे यांच्यासह ७० कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. यानंतर महापालिका प्रशासनाने हा पुतळा पुन्हा झाकून ठेवला.
त्यानंतर आज नेरूळ परिसरातील महाराज्यांच्या पुतळ्याचे अधिकृत अनावरण अखेर वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव असूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजीचे संकेत दिसत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
नगरपालिकेने शिंदेंना अधिकृत निमंत्रण पाठवले होते, तरीही त्यांच्या वेळापत्रकात हा कार्यक्रम नसल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या बॅनरमध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचा एकत्रित फोटोही झळकवत महत्त्व दर्शवण्याचा प्रयत्न झाला होता. पण शिंदेंच्या अनुपस्थितीने महत्त्वाचे प्रश्न निर्माण केले आहेत.
नेरूळ परिसरात शिवरायांचा पुतळा गेल्या सहा महिन्यांपासून झाकलेला होता. पालिकेकडून अनावरण न झाल्याने स्थानिक पातळीवर नाराजी वाढत होती. याच पार्शवभूमीवर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात अखेर सरकारला जाग आलीच…! गेले चार महिने, नवी मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धूळ खात तसाच होता. हा फक्त एक पुतळा नाही, तर आपल्या महाराष्ट्राची हि अस्मिता आहे. राजकीय नेत्यांना त्यांच्या खाजगी कार्यक्रमांसाठी वेळ होता, परंतु महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी मात्र त्यांना चार महिने लागावेत! तेव्हा, महाराष्ट्र सैनिकांनी यासाठी पुढाकार घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन जनतेला मिळाव यासाठी जे करावं लागलं, ते अभिमानाने केलं! अशी एक्सपोस्ट अमित यांनी केली.
हे देखील वाचा –









