Home / महाराष्ट्र / Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळात अदाणी प्रभाव; अदाणींनी सुरु केली स्वतःची विमान कंपनी? देशांतर्गत उड्डाणांचा नवा अध्याय सुरू

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळात अदाणी प्रभाव; अदाणींनी सुरु केली स्वतःची विमान कंपनी? देशांतर्गत उड्डाणांचा नवा अध्याय सुरू

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले व्यावसायिक देशांतर्गत उड्डाण काल पासून म्हणजेच गुरुवार, २५ डिसेंबरपासून सुरू...

By: Team Navakal
Navi Mumbai International Airport
Social + WhatsApp CTA

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले व्यावसायिक देशांतर्गत उड्डाण काल पासून म्हणजेच गुरुवार, २५ डिसेंबरपासून सुरू झाले. अदाणी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज आणि सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (सिडको) यांनी संयुक्तपणे हे विमानतळ विकसित केले आहे. २५ डिसेंबर नाताळाच्या दिवशी व्यावसायिक उड्डाण सुरू झाल्याने अदाणी समुहाने प्रवाशांना ख्रिसमसची भेट दिल्याचे देखील म्हटले जात आहे.

उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी सकाळी ८: ०० वाजता इंडिगोचे (६ ए ४६०)हे पहिले व्यावसायिक विमान बंगळूरवरून नवी मुंबईत दाखल झाले. यावेळी विमानाचे स्वागत पारंपरिक पद्धतीने ‘वॉटर कॅनन’ सलामी देऊन करण्यात आले. पहिल्या दिवशी नऊ देशांतर्गत शहरांसाठी ४८ उड्डाणांचे यशस्वी संचलन झाले, ज्यातून सुमारे ४,००० प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे, पहाटे ५ ते ७ या वेळेत प्रवाशांचा सर्वाधिक ओघ यावेळी पाहायला मिळाला.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) येणारा ताण कमी करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित केलेला हा प्रकल्प पूर्णत्वाला गेला असल्याचे काल अगदी ठळक पणे दिसून आले. या विमानतळामुळे मुंबईच्या दळणवळण क्षमतेत मोठी भर पडली असल्याचे दिसते. तसेच अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी स्वतः उपस्थित राहून पहिल्या विमानातील प्रवाशांचे स्वागत देखील केले. परंतु हे सगळे जरी असले तरी नवी मुंबईच्या विमानतळावर एक गोष्ट प्रकर्षाने निदर्शनात आली ती म्हणजे अदानी समूहाचे अदाणी असे लिहलेले विमान.

सध्या सोशल मीडियावर नवी मुंबई विमानतळावरील एका रीलने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यात अदाणी समूहाचे अदाणी असे लिहलेले विमान नवी मुंबई विमानतळावर पाहायला मिळाले. शिवाय एका रीलमध्ये विमानामधील सीटवर ‘ए’ (A) हे अक्षर स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे अदाणी समूहाची स्वतःची विमान कंपनी सुरु झाली आहे का? अश्या चर्चाना जोरदार उधाण आले आहे. शिवाय या कंपनीला अधिकृत मान्यता दिल्याबद्दल देखील अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. या सर्व संकेतांमुळे अदाणींनी पडद्यामागून स्वतःची एअरलाइन सुरू केली आहे का,असा खडा प्रश्न आता चर्चेत आहे.

शिवाय इतक्या कमी वेळात विमानतळ उभारणी अदानी समूहाची गुंतागुंतीच्या, राष्ट्रउभारणीसाठी महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विक्रमी वेळेत साकार करण्याची अदाणी उद्योगसमूहाची क्षमता यांचे देखील कौतुक केले जात आहे. दरम्यान प्रवासी वाहतूक सुरू होत असल्याबाबत उद्योगपती गौतम अदाणी यांनी आनंद देखील व्यक्त केला होता.

गौतम अदाणी म्हणाले, मुंबईकरांसाठी हा एक अतिशय अभिमानाचा क्षण आहे. आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की, आम्हाला या विमानतळाचा विकास करण्याची संधी मिळाली. या नवीन विमानतळाचे निर्माण करत असताना आम्ही ते जागतिक दर्जाचे बनविण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. मुंबईच्या विद्यमान विमानतळावरील भार यानिमित्ताने कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे गौतम अदाणी म्हणाले.

नवी मुंबई विमानतळ पहिल्या टप्यात देशातील १६ शहरांशी जाणार जोडले –

पहिल्याच दिवशी नवी मुंबईहून बेंगळुरू, हैद्राबाद, गोवा, कोची आणि अहमदाबादसाठी उड्डाणे सुरू झाले. आणि त्यानंतर पुढील काही दिवसातच देशातील तब्बल १६ प्रमुख शहरांशी हवाई संपर्क प्रस्थापित करत नवी मुंबई भारतीय विमानवाहतुकीच्या नकाशावर स्वतःची अशी स्वतंत्र ओळख निर्माण करणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी जवळपास ३० विमानांची ये-जा झाली, तर तब्ब्ल चार हजार प्रवाशांनी पहिल्या उड्डाणाचा अनुभव घेतला.

एनएमआयए पहिल्या टप्प्यात देशांतर्गत अहमदाबाद, औरंगाबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोचीन, कोईम्बतूर, दिल्ली, गोवा (डाबोळी व मोपा), हैदराबाद, जयपूर, जम्मू, कोलकाता, लखनौ, मंगळुरू, नागपूर आणि वडोदरा हि १६ शहरे थेट हवाई वाहतूकीच्या संपर्कात येणार आहेत. या सर्व शहरांमधून उद्घाटनाच्या दिवशी पाच शहरांमध्ये विमानांची ये-जा झाली असून, विशेषतः यातील अनेक मार्गावरील प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील पाहायला मिळाला. सिडको प्रशासनानुसार, जानेवारीच्या मध्यापासून प्रतिदिन ४८ विमानांची ये-जा अपेक्षित असल्याचे देखील बोलले जात आहे. या शिवाय फेब्रुवारी २०२६ पासून विमानतळ २४ तास कार्यरत होणार आहे. या सगळ्यांबरोबर नवी मुंबई विमानतळाच्या बांधणीची देखील जोरदार चर्चा आहे.

नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्यं पुढील प्रमाणे ? (What are the features of Navi Mumbai Airport?)
विमानतळ उभारणीस एकूण खर्च १ लाख कोटींहून अधिक झाला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकूण ११६० हेक्टरवर हे विमानतळ उभारण्यात आले आहे.
जगातील सर्वात मोठ्या लंडन येथील हिर्थो विमानतळाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची तुलना केली जात आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन रनवे देखील आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३५० एअरक्राफ्ट पार्किंगची सुविधा सुद्धा आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यावरणपूरक असेल, हरित उर्जेचा वापर आणि जलसंधारण यावर विशेष भर देण्यात आला आहे.
टर्मिनलमध्ये डिजिटल आर्टच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा देखील सुरेख प्रयत्न केला आहे.
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील ७० टक्के लोड कमी होणार असल्याचे देखील बॊलले जात आहे.
पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन्ही सुविधा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिळणार आहेत.

तसेच काल या पहिल्या व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाणाचे दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नातू अनुप पाटील हे देखील साक्षीदार झाले. त्याच वेळी उद्घाटन प्रवासाचे प्रतीकात्मक निषेधात रूपांतर झाले जेव्हा अनुप पाटील यांनी बेंगळुरू ते नवी मुंबई या पहिल्या इंडिगो विमानाने प्रवास केला आणि विमानतळाचे नाव शेतकरी नेत्याचे नाव बदलण्याच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

यावेळी दि. बा.पाटील यांचे नातू अनुप पाटील यांनी परिधान केलेले टी-शर्ट देखील सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पाटील यांनी “लोकनेते दि. बा. पाटील अंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मध्ये आपले स्वागत” असे लिहिलेले टी-शर्ट परिधान करून ते विमानात चढले आणि पाटील यांचे छायाचित्र असलेले होर्डिंगही हातात घेतले.

माजी आमदार संजीव नाईक आणि त्यांच्या पत्नी कल्पना नाईक यांनी अनुप पाटील यांना पाठबळ दिल्याचे देखील यावेळी दिसले. याप्रसंगी बोलताना अनुप पाटील म्हणाले, “हा प्रवास सरकारला आठवण करून देणारा होता की त्यांनी अद्याप विमानतळाचे नाव लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावावर केलेले नाही.”

यावर माजी आमदार संजीव नाईक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. विमानतळाच्या दीर्घ राजकीय आणि प्रशासकीय प्रवासाची आठवण करून देताना माजी आमदार संजीव नाईक म्हणाले, “सुमारे १५ वर्षांपूर्वी, जेव्हा मी खासदार होतो, तेव्हा मी विमानतळाचा ठराव मंजूर करून घेतला. मनमोहन सिंग सरकारने सहा महिन्यांत पर्यावरणीय मंजुरीचे आश्वासन दिले होते आणि त्या कालावधीतच ते मंजूर झाले. उद्घाटनाच्या दिवशी पहिल्या विमानात प्रवास करणे हा एक ऐतिहासिक क्षण आहे. एकदा तिसरा धावपट्टी मंजूर झाली की, त्यामुळे अर्थव्यवस्थेला प्रचंड चालना मिळेल असे देखील ते म्हणाले.

याशिवाय आता या विमानतळामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होणार असल्याचे देखील दिसून येत आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा विमानतळ प्रकल्प प्रत्यक्षात उतरत असताना, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील रहिवाशांसाठी विमानतळापर्यंत पोहोचण्याचे जलद मार्ग कोणते असतील, याबाबत देखील संभ्रम पाहायला मिळाला.

नवी मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी सर्वोत्तम जलद मार्ग कोणते?
नवी मुंबईतील वाशी, नेरूल आणि बेलापूर यासारख्या भागांतून विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी पाम बीच रोड आणि बेलापूर-उल्वे रोड हा सर्वात सोयीस्कर असा मार्ग आहे. वाशीपासूनचे अंतर सुमारे १४ किलोमीटर असून, सामान्य वाहतुकीत २० ते ३० मिनिटे लागू शकतात. मात्र गर्दीच्या वेळी हा वेळ ४५ ते ६० मिनिटांपर्यंत देखील वाढण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईच्या पूर्वेकडील भागांतून येणाऱ्यांसाठी सायन-पनवेल महामार्ग हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या महामार्गावरून उल्वे-बेलापूर रोडला देखील जोडले जाऊ शकते. सुरुवातीच्या ठिकाणानुसार अंतर ९ ते १३ किलोमीटरपर्यंत असते आणि सरासरी प्रवास वेळ ३० ते ४५ मिनिटे इतका लागते. हा मार्गही कमी-अधिक प्रमाणात वाहतूक असल्याने तुलनेने जलद समजला जातो.

पनवेलहून विमानतळापर्यंत जलद पोहोचण्यासाठी मुख्य मार्ग
पनवेलहून विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी मुख्य मार्ग सायन-पनवेल महामार्गच सध्या आहेत. कळंबोली सर्कलमार्गे हा महामार्ग एनएच ५४८ आणि उल्वे-बेलापूर या रोडला जोडतो. याशिवाय अमरा मार्ग म्हणजे एनएच ३४८ ए किंवा उरण-पनवेल रोड हा पर्यायी मार्ग देखील उपलब्ध आहेत. पनवेलपासून विमानतळापर्यंतचे अंतर १५ ते २० किलोमीटर असून, सामान्य परिस्थितीत २५ ते ४० मिनिटांत हे अंतर पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा मार्ग तुलनेने कमी गर्दीचा असल्याने प्रवाशांना अधिक सोयीचा देखील वाटतो. तसेच, मुंबईकडून येणाऱ्यांसाठी हाच मार्ग अटल सेतुशी जोडला जातो, ज्यामुळे दळणवळण अधिक सुलभ बनते.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या