Home / महाराष्ट्र / नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू; कोडपासून ते कनेक्टिव्हिटीपर्यंत जाणून घ्या महत्त्वाची माहिती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू; कोडपासून ते कनेक्टिव्हिटीपर्यंत जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Navi Mumbai Airport: भारताच्या सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) या महिन्याच्या अखेरीस उद्घाटनासाठी...

By: Team Navakal
Navi Mumbai Airport

Navi Mumbai Airport: भारताच्या सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) या महिन्याच्या अखेरीस उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) नंतर मुंबईचे हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे.

लवकरच प्रवाशांसाठी खुल्या होणाऱ्या या नवीन विमानतळाविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

प्रवाशांनो, ‘हा’ कोड तपासा

आता मुंबईहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या फ्लाईटच्या तपशिलाची, विशेषतः विमानतळ कोडची दोनदा खात्री करावी लागणार आहे. सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी (CSMIA) ‘BOM’ हा कोड वापरला जातो, तर नवी मुंबई विमानतळाला International Air Transport Association (IATA) कोड म्हणून ‘NMI’ दिला आहे.

शिवाय, NMIA चा International Civil Aviation Organisation (ICAO) कोड ‘VANM’ आहे. प्रवासाची योजना आखताना, प्रवाशांनी विमानतळ कोडची खात्री करणे आवश्यक आहे, कारण NMIA ‘NMI’ म्हणून नोंदवले जाईल.

कोणत्या एअरलाईन्स उड्डाण करणार?

नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण सुरू करणाऱ्या पहिल्या एअरलाईन्सपैकी एक IndiGo असेल. सुरुवातीला ती दररोज सुमारे 18 उड्डाणे सुरू करण्याचा विचार करत आहे, जी 15 पेक्षा जास्त देशांतर्गत शहरांना जोडतील आणि 2026 पर्यंत आंतरराष्ट्रीय मार्ग जोडले जातील. त

सेच, Akasa Air नेही पहिल्या दिवसापासून सुमारे 100 साप्ताहिक देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. NMIA च्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी सुमारे 20 दशलक्ष प्रवाशांची सोय अपेक्षित आहे.

असे आहे विमानतळ आणि कनेक्टिव्हिटी

NMIA हे पनवेल, नवी मुंबईजवळील उलवे, रायगड जिल्ह्यात आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) दक्षिण मुंबईला थेट NMIA शी जोडून प्रवासाचा वेळ कमी करेल. सायन-पनवेल महामार्ग आणि ठाण्याहून नियोजित उन्नत रस्ताही महत्त्वाचे मार्ग आहेत.

तसेच, NMIA जवळच मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनवरील पनवेल रेल्वे स्टेशन आहे. MSRTC आणि इतर संस्था मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातून विमानतळासाठी विशेष बस सेवा सुरू करण्याची योजना आखत आहेत.

हे देखील वाचा GST कमी झाल्याने गाड्या स्वस्त; Jaguar Land Rover ने जाहीर केल्या नव्या किंमती, ‘या’ मॉडेलवर 30 लाखांची सूट

Web Title:
संबंधित बातम्या