NCP Offer – भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Minister Murlidhar Mohol) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Nationalist Congress Party)मिळालेल्या पक्षप्रवेशाच्या ऑफरचा किस्सा एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितला.त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार (Dr. Keshav Baliram Hedgewar) इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री सुभाष भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री बाबासाहेब पाटील (Minister Babasaheb Patil,), खा. श्रीरंग बारणे, आ. सुनील शेळके, माजी आ. बाळा भेगडे आदी उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले की, २०१९ विधानसभा निवडणुकीदरम्यान (Assembly elections)सुनील शेळकेयांना भाजपाने तिकीट नाकारले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यावर त्यांनी पहिला फोन मला केला. शेळके (Sunil Shelke) मला म्हणाले की माझे भाजपामधून तिकीट कापले , पण राष्ट्रवादीकडून मला उमेदवारी मिळाली आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यामुळे तुझेही तिकीट कापले आहे तू पण माझ्याबरोबर ये.त्यावर मी त्यांना उत्तर दिले की मी दिल्या घरात सुखी आहे. मी माझ्या पक्षात राहील. तू पण विचार कर , घाई करू नकोस. मात्र शेळकेंनी त्यावर म्हटले की मी परतीचे दोर कापले आहेत. तो त्या पक्षात गेला आणि त्याचे भले झाले. मी माझ्या पक्षात राहिलो आणि माझेही भले झाले. आमच्या दोघांचे नाते असे राजकारणापलीकडचे आहे.
हे देखील वाचा –
उत्तर प्रदेशात धर्मांतर केल्याचे आरोप खोटे कोर्टाचा संताप !एकही सबळ पुरावा नाही