Home / महाराष्ट्र / Mandal Yatra: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मंडल यात्रा तात्पुरती स्थगित

Mandal Yatra: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मंडल यात्रा तात्पुरती स्थगित

Mandal Yatra

Mandal Yatra: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून ओबीसी आरक्षणाच्या जागरासाठी काढण्यात आलेली ‘मंडल यात्रा’ ( NCP Sharad Pawar faction Mandal Yatra) तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ९ ऑगस्टपासून सुरू झालेली ही यात्रा राज्यभर गाजत होती. मात्र सध्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आझाद मैदाना(Azad Maidan)वर आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तूर्त यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शरद पवार यांनी दिलेल्या सामाजिक न्यायाची आणि भाजपाच्या ओबीसी (OBC) विरोधी धोरणाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मंडल यात्रा सुरू करण्यात आली आहे. पक्षाच्या ओबीसी सेलमार्फत प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू होती. पहिल्या टप्प्यात विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये ती पार पडणार होती.

शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात मंडल आयोग लागू केला होता. महाराष्ट्र हे मंडल आयोग लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले होते. भाजपचे ओबीसीवरील प्रेम हे ‘पुतना मावशीचे’ असल्याची टीका करत शरद पवार गटाने ओबीसी जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न या यात्रेद्वारे केला जात आहे.


ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

शिंदेंकडून फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आंदोलकांना मदत ! खा. संजय राऊतांची टीका

बाप्पा पावला! गोकुळ दूध संघाचा मोठा निर्णय; दुधाच्या खरेदी दरात वाढ