Home / महाराष्ट्र / Neelam Gorhe : महायुतीत जागा वाटपावरून धुसफुस; नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांच तीव्र आंदोलन

Neelam Gorhe : महायुतीत जागा वाटपावरून धुसफुस; नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांच तीव्र आंदोलन

Neelam Gorhe : पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना (BJP And Shivsena) एकत्रित युतीमध्ये लढणार असल्याचं चित्र जरी स्पष्ट असलं...

By: Team Navakal
Neelam Gorhe
Social + WhatsApp CTA

Neelam Gorhe : पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना (BJP And Shivsena) एकत्रित युतीमध्ये लढणार असल्याचं चित्र जरी स्पष्ट असलं तरी अद्यापही जागावाटपावरून दोन्ही पक्षाकडून तोडगा निघालेला नसल्यचे दिसत आहे. अशातच शिंदे गटाने (BJP And Shivsena) मागितलेल्या २० ते २५ जागा द्यायला भाजप तयार नाही आहे आणि अशातच नाराज इच्छुक उमेद्वारांमधील अस्वस्थता प्रकर्षाने दिसून येत आहे.

शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे सांगत कमर्शिअल पद्धतीने तिकीट वाटप होत असल्याचा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन करून गोऱ्हे यांच्या घराबाहेर ठिय्या मांडला. त्यानंतर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत नीलम गोऱ्हे यांनी अखेर या पदाधिकाऱ्यांची समजूत काढली.

पुण्यात युतीमध्ये जागा वाटपावरून प्रचंड धुसफुस असल्याचे दिसून येते. महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला ३५ जागा देण्यात याव्यात अशी मागणी भाजपकडे करण्यात आली होती. पण सध्याच्या घडीला १५ जागा देण्यास भाजपा तयार असल्याचे दिसून आले. असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी शिवसैनिकांची समजूत काढून जागा वाटपासंबंधी सुरू असलेल्या चर्चेचा तपशील त्यांना सांगण्यात आला.

येत्या दोन दिवसात जागा वाटपाबाबत चर्चा होईल. त्यातून मार्ग निघेल असा विश्वास शिवसेना नेत्या तसेच उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला. त्यानंतर आज पुणे शहरातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी येथील शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सिल्व्हर रॉक्स निवासस्थाना बाहेर शहरातील विविध भागातील शिवसैनिकांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.

कमर्शिअल तिकीट वाटपाचा मुद्दा नीलम गोऱ्हेकडून अमान्य
तिकीट वाटपाचा निर्णय कोणीही एक व्यक्ती घेत नसतो. संपूर्ण पुणे शहरातील कोअर कमिटीतील नेते तिकीट वाटपापाच्या मुद्द्यावर चर्चा करतात आणि मग निर्णय घेतात. कोअर कमिटीतील नेत्यांच्या शिफारशीनुसार उमेदवारीचे सूत्र अंतिम होते, असे सांगत कमर्शिअल तिकीट वाटपाचा मुद्दा नीलम गोऱ्हे यांनी फेटाळला.

पुढे त्या म्हणाल्या आज आलेले पदाधिकारी नेहमीच माझ्या घरी येतात. आज पहिल्यांदाच ते घरी आले अशातला भाग नाही. आमची सकारात्मक चर्चा झाली. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची समजूत काढण्याचा देखील मी प्रयत्न केला, असे गोऱ्हे यांनी सांगितले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या