New India Bank Scam – मुंबईतील न्यू इंडिया सहकारी बॅंकेच्या सुमारे १२२ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता ( Hitesh Mehta) यांचा जामीन अर्ज (Bail Rejected)न्यायालयाने फेटाळला आहे. कोर्टाने म्हटले आहे की हा गुन्हा खूप मोठ्या रकमेचा असून आरोपीविरुद्ध गंभीर आरोप आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींपैकी माजी सीईओ अभिमन्यू भोन याचा देखील जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
हितेश मेहता हे या बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. ते बँकेचे माजी महाव्यवस्थापक (Former General Manager) आणि खाते विभागप्रमुख होते. हितेश मेहता यांच्यावर कोविड काळात बँकेच्या प्रभादेवी (Prabhadevi)आणि गोरेगाव (Goregaon)येथील कार्यालयातून एकूण १२२ कोटी रुपये वळवून अफरातफर केल्याचा आरोप आहे.
न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी आर. सोलापुरे (Chief Judicial Magistrate R. Solapur)यांनी हितेश मेहताचा जामीन नाकारताना आपल्या आदेशात म्हटले की,या आरोपीने रोख रक्कम घेऊन ती इतर आरोपींच्या माध्यमातून वळविण्याचे काम केले आहे.आरोपीची गुन्ह्यातील भूमिका आरोपपत्रात स्पष्टपणे मांडली असल्याचे दिसून येत आहे. घाईघाईने आरोपपत्र मांडले गेले आहे असे म्हणता येणार नाही. हितेश मेहता यांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी म्हटले होते की, मेहता यांना १४ फेब्रुवारी २०२५ च्या एका प्रतिज्ञापत्रावर जबरदस्तीने कबुली देण्यास भाग पाडले असल्याने ते पुराव्यादाखल ग्राह्य धरू नये. गुन्हा दाखल करण्यात विलंब झाला आहे.
हे देखील वाचा –
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज लेफ्टनंट कर्नल बनला
दीपिका-रणवीरची लेक ‘दुआ’ कोणासारखी दिसते? लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर केला मुलीचा फोटो
सोशल मीडियावरील कंटेंट हटवण्याचे नियम बदलले; केवळ ‘या’ अधिकाऱ्यांना असणार अधिकार