Home / महाराष्ट्र / Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ प्रकरणात मोठा ट्विस्ट.. निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द..

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ प्रकरणात मोठा ट्विस्ट.. निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द..

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ प्रकरण कोणत्या कोणत्या कारणामुळे कायमच चर्चेचा विषय बनले आहे. आणि आता अशातच घायवळ प्रकरणात एक...

By: Team Navakal
Nilesh Ghaiwal

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ प्रकरण कोणत्या कोणत्या कारणामुळे कायमच चर्चेचा विषय बनले आहे. आणि आता अशातच घायवळ प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. निलेश घायवळचा पासपोर्ट आता रद्द (Pune Nilesh Ghaywal Case) करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून याबाबतची ऑर्डर देखील जारी करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ संदर्भात अहवाल सादर केला होता. पासपोर्ट रद्द झाल्याने निलेश घायवळच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.(Pune Nilesh Ghaywal Case)पुण्यातील कोथरूडमधील गोळीबारानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ चांगलाच चर्चेत आला होता, त्यावेळी पोलीसतपासात समोर आले की पोलिसांना चकवा देत घायवळ परदेशात पळून गेला.

विशेष म्हणजे त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला याविषयी पोलिस प्रशासनावरच तीव्र टीका होत होती. या संदर्भात पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये अहिल्यानगरमधील त्याच्या गावाच्या पत्तावर त्याने पासपोर्ट काढला असे समोर आले. विशेष म्हणजे या पासपोर्टसाठी त्याने आपल्या आडनावात देखील बदल केला. ‘घायवळ’ या आडनावा ऐवजी ‘गायवळ’ नावाची कागदपत्रे त्याने सादर केली होती. आता अखेर त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.

गायवळ नावावर कोणतेही गुन्हेगारी कृत्य नोंद नसल्या कारणाने पोलिसांनी त्याला एनओसी दिले. तसेच पासपोर्ट ऑफीसला आपल्यावर गुन्हा दाखल नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्रसुद्धा त्याने दिले होते. यामुळे त्याला पासपोर्ट अगदी सहज मिळाला. मात्र, परदेशात पळून गेलेल्या घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले होते. निलेश घायवळ याने पासपोर्टसाठी खोटी कागदपत्रे तयार केली होती. पोलिस रिकोर्डमध्ये त्याचे नाव निलेश घायवळ आहे. त्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी त्याने निलेश गायवळ या खोट्या नावाने आधारकार्ड काढले.

हे देखील वाचाHealthy Tips : जेवणाचे सेवन करताना तुम्ही सुद्धा या चुका करता का? तस असेल तर आताच थांबा!

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या