‘गोल टोपी आणि दाढीवाल्यांनी मला मत दिलं नाही… मुंबईचा DNA हिंदू’, नितेश राणेंचं वक्तव्य चर्चेत

Nitesh Rane Controversial Speech

Nitesh Rane Controversial Speech | भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे हे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात मुस्लिम समाजाला उद्देशून पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापवले आहे.

“गोल टोपी आणि दाढीवाल्यांनी मला मत दिले नाही, मी हिंदूंच्या मतांनी आमदार झालो,” असा दावा करत त्यांनी विशिष्ट समुदायावर टीका केली. “मुंबईचा डीएनए हिंदू आहे,” असे म्हणत त्यांनी उर्दू बोलणाऱ्यांनाही लक्ष्य केले, ज्यामुळे राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे

मी हिंदूंच्या मतांनी आमदार झालो आहे. जर मी हिंदूंना पाठिंबा दिला नाही, तर उर्दू बोलणाऱ्यांना पाठिंबा देईन का?… ते हिरवे साप आहेत… मुंबईचा डीएनए हिंदू आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.

राणे यांनी मनसे नेते जावेद शेख यांच्या मुलाच्या मराठी इन्फ्लुएंसरसोबत झालेल्या वाद आणि मराठी भाषेवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केले. त्यांनी मनसेवर कारवाई न केल्याचा आरोप करत म्हटले, “शेखवर कारवाई होणार नाही, कारण त्यांनी जिहादींना संतुष्ट करण्याचे कंत्राट घेतले आहे.” मोहम्मद अली रोड आणि बहेरामपाडा परिसरात मनसेची नरमाईची टीकाही त्यांनी केली.

राज ठाकरेंवर टीका

नितेश राणे यांनी मराठीच्या मुद्यावरून राज ठाकरेंवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, राज ठाकरे जर मराठीवर प्रेम करतात, तर अजान मराठीत करून मदरशांत उर्दूऐवजी मराठी सक्ती करावी.”, अशी टीका त्यांनी केली.