Home / महाराष्ट्र / Rajan teli :बँक कर्जवाटप घोटाळ्याचे नितेश राणे मुख्य सूत्रधार ! राजन तेलींची पोलिसांकडे तक्रार

Rajan teli :बँक कर्जवाटप घोटाळ्याचे नितेश राणे मुख्य सूत्रधार ! राजन तेलींची पोलिसांकडे तक्रार

Rajan teli- गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा सोडून शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश करणारे माजी आमदार राजन तेली (Rajan teli)यांनी दसरा मेळाव्यात...

By: Team Navakal
Rajan teli

Rajan teli- गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा सोडून शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश करणारे माजी आमदार राजन तेली (Rajan teli)यांनी दसरा मेळाव्यात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशाला चार दिवस होत नाही, तेच तेलींनी कोकणातील मातब्बर राणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक घोटाळ्यात भविष्यात अटक टाळण्यासाठी तेली हे शिंदे गटात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असतानाच या घोटाळ्याचे सूत्रधार राज्याचे मस्त्योद्योग मंत्री नितेश राणे हेच असल्याचा आरोप तेलींनी (Rajan teli)केला आहे. त्यामुळे आता तळकोकणात राणे विरुद्ध तेली असा सामना रंगणार आहे.

या वादाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तेली यांनी (Rajan teli)पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे नितेश राणेंविरुद्ध केलेल्या तक्रारीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक विश्वनाथ दोरलेकर यांनी कर्ज व्यवहारातील फसवणूक प्रकरणाची तक्रार सीबीआयकडे केली होती. तक्रारीनुसार, २०२१ ते २०२२ दरम्यान कर्ज रकमेचा गैरवापर करून चुकीचे व्यवहार करण्यात आले. यात माजी आमदार तेलींसह आठ जणांचा सहभाग असल्याचे नमूद केले आहे. मुंबईतील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे पोलीस अधीक्षक यांनी या तक्रारीवर चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तेली तडकाफडकी शिंदे गटात आल्याचे बोलले जात आहे.

तेली हे अनेक दशके राणेंचा उजवा हात मानले जायचे. मात्र राणेंची दोन्ही मुले राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांचे राणे कुटुंबाशी खटके उडू लागले. त्यामुळे त्यांनी तेव्हा काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. नंतर नारायण राणेही आपल्या मुलांसह भाजपात गेले.

.परप्रांतियांना कर्ज दिल्याचा आरोप
कोकणातील जमिनी परप्रांतियांना विकत घेता याव्यात म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अवैधरीत्या कर्ज वाटप करण्यात आले. या कर्ज वाटप घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार नितेश राणे असून या प्रकरणी सखोल चौकशी केली जावी, अशी विनंती तेली यांनी पोलिस महासंचालकांना लिहिलेल्या एका पत्राद्वारे केली आहे. तेली हे स्वतः या बँकेचे माजी अध्यक्ष आहेत.

मंत्री राणे हे जिल्हा बँकेचे सहसंचालक आहेत. त्यांनी बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दबाव टाकून मोठ्या रकमांची कर्ज वाटप केली. बँकेत मानधनावर असलेल्या कामगारांना ८ कोटीपर्यंत कर्ज दिली गेली. त्यासाठी ते स्थानिक रहिवासी असल्याची खोटे कागदपत्रे तयार करण्यात आली. काजू लागवडीसाठी कर्ज उचलण्यात आली. मात्र प्रत्यक्षात कोट्यवधींच्या जमिनी खरेदी करण्यात आल्या. या जमिनींच्या विक्रीतून नफा कमावला जात आहे, असा आरोपही तेली यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

टीव्ही कार्यक्रमात जाहिरातींची अडचण?पुण्यातील आजीबाईंची सुप्रिया सुळेंकडे तक्रार….

इंदू मिल स्मारक पुतळा प्रतिकृतीत दोष?डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखा दिसतच नाही!

मंत्री कोकाटेंची रोहित पवारांच्या विरोधात कोर्टात धाव!

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या