Nitesh Rane On Sanjay Raut : राजकीय वर्तुळ म्हटलं कि कायमच कोणत्या ना कोणत्या कारणावरून जोरदार चर्चा रंगतच असतात. त्यातच संजय राऊतांच्या (Sanjay raut) आरोग्यविषयक बातमी वाऱ्यासारखी पसरली. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील दोन महिने सामाजिक जीवनापासून दूर राहण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला आहे. त्यांनी या संधर्भात एक्सवर याची माहिती देखील दिल आहे.
त्यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना काळजीचे आवाहन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाची धडाती तोफ नरमलेली पाहायला मिळत असून ठाकरेंच्या पक्षासाठी मात्र हि फारशी चांगली बातमी नाही. संजय राऊतांच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींनी देखील त्यांना काळजी घ्याचे आवाहन केले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनीही संजय राऊतांनबद्दल काळजी व्यक्त केली आहे. आता संजय राऊत यांचे कट्टर विरोधक असलेले भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांची देखील याबाबत प्रतिक्रिया समोर आली आहे.
.@rautsanjay61 जी..
— Nitesh Rane (@NiteshNRane) November 1, 2025
काळजी घ्या
लवकर बरे व्हा!
नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
संजय राऊत हे कायमच राणे कुटुंबावर टीका करताना दिसतात, तर नितेश राणे देखील याला काही अपवाद नाही. त्यांनी देखील अनेकदा राऊत यांच्यावर तीव्र भाषेत टीका केली आहे. मात्र, राऊत यांच्या प्रकृतीची बातमी समजताच नितेश राणे यांनी देखील काळजी व्यक्त केली. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट देखील केली आहे. ते लिहितात, “संजय राऊत जी… काळजी घ्या, लवकर बरे व्हा!” असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा – Ratnagiri : रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेने विरुद्ध भाजपा अशी चुरस रंगणार का?









