Nitesh Rane VS Deepak Kesarkar : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात महायुती करण्यास पालकमंत्री नितेश राणेंनी फारशी इच्छा दाखवली नाही. त्यामुळे युती होऊ शकणार नाही, अशी माहिती आमदार दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी दिली आहे. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकत्र निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी, मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही याबाबत अधिक माहिती दिली होती तेव्हा त्यांनी स्वबळाची तयारी असल्याचे संकेत देखील दिले होते. आता, राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा झाली असून राजकीय पक्ष जोमाने कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.
सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणेंनी भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल असा पवित्रा घेतल्यानंतर आता शिवसेनेनंही दंड थोपटले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे इच्छुक नसल्याने युती होऊ शकली नाही. आमदार दिपक केसरकरांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
काल भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पालकमंत्री नितेश राणेंनी ताकद भाजपची असल्यामुळे स्वबळावर निवडणुका झाल्या पाहिजेत असे सांगितले. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या तशाच भावना आहेत, आपण आपला झेंडा फडकला पाहिजे. संपूर्ण कोकणात एकही विधानसभेची जागा दाखवा जी भाजपच्या ताकदीशिवाय कोणी आमदार होऊ शकला का? असं वक्तव्य राणेंनी केलं आहे. सिंधुदुर्गात असा एकही मतदारसंघ नसल्याचे देखील नितेश राणेंनी म्हटले आहे.
हे देखील वाचा –
Manoj Jarange : मनोज जरांगेंना जीवे मारण्याचा कट; जीवे मारण्यासाठी २ कोटींची सुपारी









