Home / महाराष्ट्र / Nitesh Rane vs Nilesh Rane : भाजपा कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकल्यानंतर राणे बंधूंमध्ये पडली वादाची ठिणगी

Nitesh Rane vs Nilesh Rane : भाजपा कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकल्यानंतर राणे बंधूंमध्ये पडली वादाची ठिणगी

Nitesh Rane vs Nilesh Rane : निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्याच्या विविध भागात निवडणुकीवरून राजकीय पक्षांमध्ये प्रचंड जुंपलेली पाहायला मिळत आहे. मालवणमध्येसुद्धा...

By: Team Navakal
Nitesh Rane vs Nilesh Rane
Social + WhatsApp CTA

Nitesh Rane vs Nilesh Rane : निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्याच्या विविध भागात निवडणुकीवरून राजकीय पक्षांमध्ये प्रचंड जुंपलेली पाहायला मिळत आहे. मालवणमध्येसुद्धा निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजपामधील वाद शिगेला पोहोचला आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्त्यांच्या घरी सरळ धाड टाकली. निलेश राणे यांनी या सगळ्याचा लाईव्ह व्हिडिओ तयार करत हे स्टिंग ऑपरेशन केलं. ते हि धाड टाकण्यासाठी पोलिसांनाही आपल्या सोबत घेऊन आले होते. याच सोबत ५ ते ६ घरं असल्याचा दावाही त्यांनी केला आहे, ज्यामधून मतदारांना पैशांचं वाटप केलं जात असल्य्याचा गंभीर आरोप देखील त्त्यांनी केला आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्याचा भाऊ निलेश राणेंना देखील यावर उत्तर दिलं.

निलेश राणे म्हणतात “आम्ही राजकीय पक्षाचे सदस्य आहोत, पण आमचं वैयक्तिक आयुष्य देखील आहे. तसेच आमचे व्यवसाय आहेत. आम्ही आधी समाजकारण करतो आणि मग राजकारण करतो. विजय केनवडेकर हे या आधी अनेक वर्षापासून व्यवसाय करत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून त्यांच्या घरात हि पैश्याची उलाढाल आहे. मग यात काय चुकीच आहे?,” अशी विचारणा देखील त्यांनी केला आहे.

“भाजपाला अशा पद्धतीने निवडणुका लढविण्याची काहीच गरज नाही. आमच्याकडे मोदी साहेबांसारखं मोठं नेतृत्व आहे. फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री या,आमच्याकडे आहेत. आम्हाला अशा पद्धतीने निवडणूका लढवण्याची गरज नाही. आम्ही विकासावर, आमच्या सरकारच्या योजनांवर आजपर्यंत निवडणुका लढवत आहोत. या सगळ्या प्रकारावर राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस चौकशी करतील. ज्यांच्या घरी पैसे सापडले त्यांच्या व्यवसाय आणि पार्श्वभूमी आपण बघणार आहोत की नाही? सगळी चौकशी निःपक्षपाती होईल,” असंही ते म्हणाले. पुढे ते असही म्हणतात; “आता सगळ्या तक्रारींवर चौकशी होईल. हमाम मे सब नंगे होते है. विचारपूर्वक सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात. प्रत्येक घरात मोदी साहेबांच्या योजनेचे लाभार्थी आहेत, त्यामुळे पैसे वाटपाची गरज नाही. कोणी किती जीवाचा आटापिटा केला कितीहि प्रयत्न केले तरी निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर होतील. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणारी मानस आहोत. चौकशी होईल तेव्हा निवडणूक आयोगच याचं उत्तर देईल”. त्यामुळे निवडणुकीच्या या पार्शवभूमीवर मात्र दोन भावांमध्ये चांगलीच जुंपली असलयाचे दिसून येत आहे.


हे देखील वाचा –

वर्षाच्या शेवटी मोठी बचत! 43 इंच Smart TV मिळतायत निम्म्या किंमतीत; पाहा सर्वात स्वस्त डील

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या