Home / महाराष्ट्र / Ajit Pawar : अजित पवारांशी शेवटचे काय बोलणे झाले होते? नितीन गडकरी म्हणाले…

Ajit Pawar : अजित पवारांशी शेवटचे काय बोलणे झाले होते? नितीन गडकरी म्हणाले…

Nitin Gadkari speech at Ajit Pawar Shoksabha : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र...

By: Team Navakal
Ajit Pawar
Social + WhatsApp CTA

Nitin Gadkari speech at Ajit Pawar Shoksabha : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र अजूनही धक्क्यात आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मुंबईतील वरळी येथील ‘डोम’मध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कमालीचे भावूक झाले होते. “अजितदादांना अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राजकारणापलीकडची घनिष्ठ मैत्री

नितीन गडकरी यांनी अजित पवारांच्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. “दादा पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यानंतर ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम करू लागले, तेव्हापासून आमची मैत्री आहे. ही मैत्री केवळ राजकारणापुरती मर्यादित नव्हती. जेव्हा जेव्हा ते दिल्लीत येत, तेव्हा माझ्या घरी न चुकता येत असत,” असे गडकरींनी सांगितले. अजित पवारांची निर्णयक्षमता, प्रशासकीय कौशल्य आणि सत्याला सत्य म्हणण्याची हिंमत ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मोठी वैशिष्ट्ये होती, असेही ते म्हणाले.

पुण्याच्या विकासासाठी ‘तो’ शेवटचा फोन

अजित पवार हे आपल्या कामाप्रती किती जागरूक होते, याचा एक किस्सा गडकरींनी यावेळी सांगितला. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यातूनच पुण्यातील 50 हजार कोटी रुपयांच्या तीन मजली उड्डाणपुलाची योजना मंजूर झाली. गडकरी म्हणाले, “हा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर मी त्यांना फोन करून ही आनंदाची बातमी दिली होती. महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यावर आपण एकत्र येऊन याचे भूमीपूजन करू, असे आमचे ठरले होते. हाच आमचा शेवटचा फोन कॉल ठरला.”

प्रशासनावरील पकड आणि विकासाची दृष्टी

अजित पवार हे अतिशय व्यावसायिक पद्धतीने काम करत असत, असे नमूद करताना गडकरी म्हणाले की, ते नेहमी खिशातून एक कागद काढायचे, ज्यावर गावागावातील छोटे-मोठे प्रश्न लिहिलेले असायचे. प्रश्न सुटेपर्यंत ते त्याचा पाठपुरावा सोडत नसत. “महाराष्ट्राने एक निर्णय घेणारा आणि विकासाची दूरदृष्टी असणारा नेता गमावला आहे. त्यांचे अकाली जाणे हा राज्याच्या राजकारणावर झालेला मोठा आघात आहे,” अशा शब्दांत गडकरींनी आपल्या जुन्या मित्राला श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या