Home / महाराष्ट्र / गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणात कारवाई न झाल्याने उबाठाचे आंदोलन

गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणात कारवाई न झाल्याने उबाठाचे आंदोलन

धुळे – धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस (Gulmohar Rest House)येथून तब्बल १ कोटी ८४ लाख रुपयांची रोकड सापडूनही एक महिन्यानंतरही...

By: Team Navakal
UBT Protests in Dhule


धुळे – धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस (Gulmohar Rest House)येथून तब्बल १ कोटी ८४ लाख रुपयांची रोकड सापडूनही एक महिन्यानंतरही ठोस कारवाई झाली नाही. या निषेधार्थ उबाठा पक्षाने धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात (Maharana Pratap Chowk)धरणे आंदोलन (Protests)केले. यावेळी एसआयटी प्रमुखाचे नाव जाहीर न करण्यासह, आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची नार्को टेस्ट घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

२२ मे २०२५ रोजी गुलमोहर रेस्ट हाऊसच्या खोली क्रमांक १०२ मध्ये उबाठाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे (MLA Anil Gote)यांनी पोलिसांसह धाड टाकून १ कोटी ८४ लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. मात्र या प्रकरणाला आता महिना उलटूनही अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याशिवाय कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी (SIT) नेमण्याचे आदेश दिले गेले असले, तरी अद्याप एसआयटी प्रमुखाचे नावही जाहीर झालेले नाही यावरूनही आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

उबाठाचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी म्हणाले की, १ कोटी ८४ लाख रुपये जप्त होऊनही अदखलपात्र गुन्हा नोंदवणे ही लोकशाहीची थट्टा आहे. सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे. चौकशी अत्यंत संथगतीने सुरू आहे. हे केवळ टाईमपास आहे. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग, अँटी करप्शन ॲक्ट व मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. तसेच आमदार अर्जुन खोतकर व किशोर पाटील यांची नार्को टेस्ट घेण्यात यावी.

Web Title:
संबंधित बातम्या