पणजी – नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघासाठी (National OBC Federationz) भव्य ओबीसी भवन (OBC Bhavan)उभारण्यात येणार असून लवकरच काम सुरू होणार आहे. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मी लढतच राहणार आहे. मी ती लढाई कधी थांबवणार नाही अशी ग्वाही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गोवा येथे आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या १० व्या राष्ट्रीय महाअधिवेशनचे (10th National Convention)उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis to)म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi,)हे ओबीसी आहेत. स्वातंत्र्यकाळानंतर मोदी यांनीच ओबीसींना मंत्रिमंडळात सर्वात जास्त स्थान दिले. मीदेखील ओबीसी महासंघाशी संबंधित आहे. त्यामुळे ओबीसी समाजासाठी (OBC community.)बोलतो, म्हणून टीकेचा सामना करावा लागतो. तरीही मी लढतच राहणार. ओबीसी समाजासाठी आमच्या सरकारने ५० महत्त्वाचे निर्णय(decisions)घेतले. आम्ही ओबीसीसाठी कुठेही निधीची कमी भासू देणार नाही. नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघासाठी भव्य ओबीसी भवन उभारण्यात येणार असून लवकरच या वास्तूचे काम सुरू करणार आहोत. उपस्थितांनी परिणय फुके (Parinay Fuke)यांना ओबीसी समाजाचा मंत्री बनवण्याची मागणी केली आहे. पण अनेक लोक त्यांना मुख्यमंत्री समजतात. त्यांची लोकप्रियता हीच त्यांच्या कार्याची साक्ष आहे.