OLA, Uber strike: आज काल सगळेच ओला उबर ह्यांचा सातत्याने वापर करतात. अश्यातच आता राज्यातील ॲप आधारित कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवस बंदची हाक दिली आहे. हा संप त्यांच्या गुरुवार, ९ऑक्टोबर २०२५ रोजी असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय गिग कामगार मंचाने हे आंदोलन पुकारले आहे.
९ ऑक्टोबर २०२५ रोजी देशभरातील वित्त विषयाचे तज्ज्ञ मुंबईत येणार आहे, यांच बरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणायची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय गिग कामगार मंचाने परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे आणि चालकांच्या समस्यांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी याच दिवशी बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
या आदोलनाच्या प्रमुख मागण्या काय आहेत?
इंधन आणि गाड्यांची देखभाल याच्या खर्चात आता कमालीची वाढ झाली आहे आणि अशातच चालकांचे उत्पन्न देखील कमी झाले आहे
या सगळ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी योग्य अशी व्यवस्था उपलबद्ध नाही.
राज्य परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर ॲग्रीगेटर्सवर कठोर कारवाई करावी.
चालकांना योग्य वेतन वाढ आणि विमा लाभ मिळावेत.
ॲप कंपन्यांकडून मनमानीपणे चालकांची खाती निलंबित करण्याचा प्रकार थांबवावा.
यावर बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही ?
३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या आंदोलनानंतर या समस्येवर तोडगा काढण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते.आंदोलक आणि परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे सचिव विद्याधर महाले यांनी बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे निर्देश अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांना दिले होते. मात्र, या बैठका घेऊन देखील कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. असे दिसून येत आहे