Home / महाराष्ट्र / Olympic Association Election : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवार विराजमान..

Olympic Association Election : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवार विराजमान..

Olympic Association Election : गेल्या काही काळापासून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक चर्चेचा विषय बनली होती. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित...

By: Team Navakal
Olympic Association Election
Social + WhatsApp CTA

Olympic Association Election : गेल्या काही काळापासून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक चर्चेचा विषय बनली होती. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे दोघंही अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न होते. दरम्यान, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्य अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झालेली आहे. एकूण ३१ सदस्य संघटनांपैकी २२ संघटनांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे.

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनचे(MOA) अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे.

ही निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीत समन्वय साधण्याचा मोठा प्रयत्न केला जात होता. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत देखील चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती मुरलीधर मोहोळ यांच्या गटाला देखील काही पदे देण्याचे ठरले. त्यानंतर मोहोळ यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतला आहे. या निवडणुकीतून अजितदादा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ते क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडू कल्याण आणि पारदर्शकतेसाठी पुढील दोन वर्षे नेतृत्व करणार आहेत.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या