Orange Benefits : आपल्या बरेचदा आपले आई वडील सांगतात कि हे फळ खा ते फळ खा पण आपण बरयाचदा यावर दुर्लक्ष करतो. पण हि फळ खरच खूप गुणकारी असतात. हे आपल्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने फळ प्रचंड उपयुक्त असतात. त्यामधील काही फळ हि आपल्याला प्रचंड आवडतात त्यातलं एक फळ म्हणजे संत्र हे केवळ चवीसाठीच नाही तर आर्योगसाठी सुद्धा चांगला असत. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, खनिज या गुणधर्मांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, ज्यामुळे शरीर आतील बाजूने मजबूत होण्यास अधिक मदत मिळते. संत्र्याच्या सेवनामुळे शरीराला थंडावा मिळत रहातो आणि चेहऱ्यावर तेजही उंडते. रोज एक संत्रं खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती अधिक बळकट अर्थात मजबूत होण्यास मदत मिळते, ज्यामुळे सर्दी-खोकला, संसर्ग आणि थकवा यासारख्या समस्यांपासून लवकर सुटका होईल.
हृदयासाठी संत्र अतिशय फायदेशीर
संत्र्यामध्ये पोटॅशिअम आणि फायबर हे गुणधर्म असतात. ज्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे पचनप्रक्रियेचे कार्य देखील सुधारते. गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून अधिक सुटका मिळते.
संत्र्याचे ज्युस आणि साल दोन्हीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचा देखील समावेश आहे. संत्र्याच्या सालीपासून पावडर तयार करुन चेहऱ्यावर पेस्ट लावल्यामुळे चेहर्यावरील पुळ्यांमुळे सुटका मिळेल आणि त्वचेवर तेजही येईल. संत्र्यांतील पोषणतत्त्वांमुळे रक्तशुद्धी देखील होण्यास मदत होते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे दृष्टी अधिक सुधारते. यामध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम देखील आहे, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास अधिक मदत मिळते. तुम्ही संत्रं सकाळी किंवा दुपारच्या वेळेस देखील खाऊ शकता.
हे देखील वाचा –
(टीप : वरील माहितीची पुष्टी आम्ही करत नाही. आरोग्यासंदर्भात निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या)









