Pandharpur Kartiki Ekadashi 2025 : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात मोठा उत्साहाच वातावरण आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त (Pandharpur Kartiki Ekadashi 2025) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी लता शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते आज सपत्नीक विठुरायाची शासकीय महापुजा संपन्न झाली.
दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदेसुद्धा पत्नी आणि मुलासह या शासकीय महापूजेला हजेरी लावली. तर मंत्री भरत गोगावले, जयकुमार गोरे देखील यावेळी पूजेला उपस्थित होते. पहाटे ४ वाजता मिनिटांनी ही महापूजा सुरू झाली. नांदेडच्या हिमायतनगरमधील पोटा गावाचे रामराव वालेगावकर आणि सौ.सुशिलाबाई वालेगावकर हे कार्तिकी एकादशीनिमित्त मानाचे वारकरी ठरले आहेत. मागील २०वर्षांपासून ते सलग वारी करत आहे. मानाची पूजा करणाऱ्या वारकऱ्यांना एक वर्षाचा एसटीचा पास देण्यात आला, तर मानाच्या वारकऱ्याला कायमचा एसटी बसचा मोफत पास देण्याचा प्रयत्न करणार असलयाचे देखील शिंदे यांनी सांगितले. यंदा प्रथमच जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनाही पूजा करण्याचा बहुमान मिळाला.

कार्तिकी एकादशीनिमित्त शिंदेनी यावेळी माध्यमांसमोर भावना देखील व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात विठ्ठल मंदिर आणि परिसरात एक वेगळी ऊर्जा आहे. चौथ्यांदा महापूजेचा मान मिळाला. खूप भाग्यवान समजतो मी याबाबत स्वतःला. शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री ही सगळी पदे विठ्ठलाच्या कृपेने मिळाली, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी यावर आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा –









