Panvel voter list scam : निवडणुकांच्या पार्शवभूमीवर अनेक बोगस मतदारांची बिंग फुटताना दिसत आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील मतदार यादीत एक अत्यंत धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला आहे. येथील मतदार यादीत चक्क एकाच व्यक्तीला २६८ मुले असल्याची भयंकर नोंद करण्यात आली आहे. आणि यातील बहुतांश नावे परप्रांतीय तरुणांची असल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रकाराविरुद्ध शेकापचे (PWP) माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी आता थेट मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली असल्याची माहिती आहे.
प्रभाग क्रमांक २ च्या नवीन मतदार यादीनुसार, एकाच वडिलांचे नाव २६८ वेगवेगळ्या मतदारांच्या नावापुढे लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या यादीतील अधिकहून जास्त तरुण हे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील आहेत. ज्या व्यक्तीला ‘वडील’ म्हणून दाखवण्यात आले आहे, ती व्यक्ती सध्या पनवेलमध्ये वास्तव्यासही नाही आहे.
या संदर्भात मात्र माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या मते, प्रभाग क्रमांक २ मध्ये सुमारे २००० मतदार बोगस किंवा दुबार (Duplicate) असण्याचा मोठा संशय आहे. यापूर्वी निवडणूक विभागाकडे हरकती नोंदवूनही सध्या नवीन यादीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे सर्व मतदार परप्रांतीय असून, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी हे ‘बोगस मतदार’ घुसवल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
प्रशासनाकडून दाद न मिळाल्याने अरविंद म्हात्रे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी निवडणूक अधिकारी आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त यांना अरविंद म्हात्रे यांनी प्रतिवादी (Party) केले आहे. त्यामुळे आता न्यायालय यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा – Mumbai News : घाटकोपरमध्ये भाजप आमदाराने रिक्षा चालकाला कानशिलात लगावली; मारहाणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल..









