Home / महाराष्ट्र / पनवेलमध्ये अर्भक सोडून गेलेल्या आई-वडिलांचा २४ तासांत शोध

पनवेलमध्ये अर्भक सोडून गेलेल्या आई-वडिलांचा २४ तासांत शोध

पनवेल – पनवेल शहरातील तक्का परिसरात काल सकाळी एका बालगृहाच्या बाहेर फुटपाथवर नवजात अर्भक (newborn baby) आढळल्याची धक्कादायक घटना घडली....

By: Team Navakal
Newborn baby found on footpath in Panvel
Social + WhatsApp CTA

पनवेल – पनवेल शहरातील तक्का परिसरात काल सकाळी एका बालगृहाच्या बाहेर फुटपाथवर नवजात अर्भक (newborn baby) आढळल्याची धक्कादायक घटना घडली. या बाळाच्या आई-वडिलांचा शोध पनवेल शहर (Panvel City Police)पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत लावला.
या दाम्पत्याने घरच्यांना न सांगता प्रेम विवाह केला होता. या महिलेची आठव्या महिन्यात प्रसूती झाली. त्यामुळे बाळाचा सांभाळ करायचा कसा अशा विवंचनेने त्यांनी बाळाला बालगृहाबाहेर सोडून दिले होते.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, रुग्णालयांच्या नोंदी आणि तांत्रिक तपासातून पोलिसांनी भिवंडी (Bhivandi)येथून दाम्पत्याला ताब्यात घेतले.प्राथमिक चौकशीत त्यांनी आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली दिली. बाळाला वाढवण्याची क्षमता नसल्याचे सांगत त्यांनी आपल्या कृत्याबद्दल पश्चात्तापही व्यक्त केला.

Web Title:
संबंधित बातम्या