Parth Pawar Land Deal : वादग्रस्त जमीन व्यवहारप्रकरणी (Controversial land deal case)राज्य उद्योग खात्याने पार्थ पवार यांच्या अमेडिया (Amedia)कंपनीला दिलेले हेतु पत्र अखेर रद्द केले.जिल्हा उद्योग केंद्र पुणे (Pune)यांनी जारी केलेल्या पत्रात त्याआधी २१ कोटी रुपयांऐवजी ५०० रुपयांचे टोकन भरून विक्री करार नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली होती.
मुंढवा परिसरात (Mundhwa area)असलेली ही जमीन ३०० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली होती आणि सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार (Government policy), मुद्रांक शुल्कातील सूट फक्त सॉफ्टवेअर पार्क धोरणांतर्गत डेटा सेंटर किंवा संबंधित कंपन्यांनाच उपलब्ध आहे,त्यामुळे हे सर्व अवैध आहे.
सूत्रांनी सांगितले की, रद्द करण्याच्या आदेशात अमेडिया एलएलपी (Amedia LLP)निर्धारित वेळेत अटी पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे हे पत्र अवैध ठरले .उद्योग विभागाने एप्रिल २०२६ मध्ये ते पत्रक जारी केलेले होते. त्यानंतर मे महिन्यात पुणे उपनिबंधक कार्यालयात जमीन करार नोंदणीकृत करण्यात आला होता. दुसरीकडे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने (Pune Sub-Registrar’s Office)स्थानिक न्यायालयात जाऊन जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे.तर पार्थ पवार यांनी अज्ञाताविरूद्ध आपली तक्रार नोंदवली असून या जमीन प्रकरणाशी आपला काहीही संबध नाही व खोट्या सह्या वापरून जमिनीची कागदपत्रे तयार करण्यात आली असा दावा केला.
हे देखील वाचा –
आयपीएल लिलावात पैशांचा पाऊस! अनकॅप्ड खेळाडू मालामाल; पाहा संघांनी कोणत्या खेळाडूंना खरेदी केले?
मेस्सीच्या भारत दौरच्या व्हिडिओची जोरदार चर्चा; व्हिडिओत राजकारण्यांना वगळले
संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट! औरंगाबाद खंडपीठाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फोटाळला









