Parth Pawar Land Scam Allegations : राज्याचे राजकारण सध्या जमीन खरेदी-विक्रीच्या एका कथित व्यवहारामुळे तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा जमीन घोटाळ्याचा आरोप केला आहे.
1800 कोटी बाजारमूल्य असलेली जमीन पार्थ पवार यांच्या ‘अमीडिया होल्डिंग्स एलएलपी’ या कंपनीने केवळ 300 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा दानवेंचा दावा आहे.
या व्यवहारातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे, 40 एकर जमिनीच्या या खरेदीसाठी मुद्रांक शुल्कम्हणून कंपनीने केवळ 500 रुपये भरले.
मेवाभाऊंच्या राज्यात…
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 5, 2025
१८०० कोटींची जमीन
३०० कोटींत खरेदी,
स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये!
उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली.…
पार्थ पवार यांच्या कंपनीवर नेमके काय आरोप?
- अल्प भांडवलाची कंपनी: अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला की, ज्या अमीडिया कंपनीचे भांडवल फक्त 1 लाख रुपये आहे, त्या कंपनीला 1800 कोटी रुपयांची जमीन 300 कोटी रुपयांना खरेदी करणे कसे शक्य झाले?
- स्टॅम्प ड्युटी माफ: दानवे यांच्या म्हणण्यानुसार, 22 एप्रिल 2025 रोजी कंपनीने आयटी पार्क (IT Park) उभारण्याचा ठराव केला आणि आश्चर्य म्हणजे, अवघ्या 48 तासांत उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटी माफ केली. 27 दिवसांत हा व्यवहार पूर्ण झाला.
- नियम वाकवले? कोणताही अनुभव नसताना केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर इतका मोठा व्यवहार सरकारी नियम वाकवून झाला असून, महसूल विभागाने विशेष सवलत दिली असल्याचा आरोप दानवेंनी केला आहे.
- ‘महार वतनाची जमीन’: ही जमीन ‘महार वतनाची’ असून, साताबारा क्लिअर नसताना तसेच मूळ मालकांना विश्वासात न घेता हा व्यवहार झाल्याचा दावाही त्यांनी केला.
शेतकऱ्यांना “सारखं फुकट, सारखं माफ लागतं” म्हणणारे अजित पवार —
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) November 5, 2025
पण पोराच्या १८०४ कोटींचे डील. त्यावर १२६ कोटींची स्टँप ड्यूटी होते , हे डील ३०० कोटीचे दाखवून, त्यावरचे २१ कोटी देखील माफ !
ही माफी फुकट नव्हती का? pic.twitter.com/3YJuXiWPd8
विरोधकांची तीव्र टीका
पार्थ पवार यांची कंपनी कोरेगाव पार्कसारख्या महागड्या भागात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी करत आहे, यावरूनही अंबादास दानवे यांनी टीका केली.
त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटले की, “शेतकऱ्यांना ‘सगळं फुकट लागतं’ म्हणणारे अजित पवार, पोराच्या 1804 कोटी रुपयांच्या डीलवर लागणारे 126 कोटी रुपयांचे स्टॅम्प ड्युटीचे शुल्क केवळ 300 कोटी रुपये किंमत दाखवून माफ करून घेतात, ही माफी फुकट नव्हती का?”
समाजसेविका अंजली दमानिया यांनीही या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दानवे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून, पार्थ पवार यांनी स्वतः समोर येऊन याबाबत खुलासा करण्याची मागणी केली आहे.
हे देखील वाचा – Vote Theft Allegations : राहुल गांधींनी दाखवलेला फोटो ‘ब्राझीलियन हेअरड्रेसर’चा; फोटो व्हायरल झाल्यावर महिलेची प्रतिक्रिया आली समोर









