Parth Pawar Pune Land Scam : मागच्या काही काळापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची सुपुत्र पार्थ पवार हे चांगलेच चर्चेत आहेत. पुण्यातील एका जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ माजली आहे.
विरोधकांनी पार्थ पवार यांच्या कंपनीने तब्बल १८०० कोटींच्या जमीन व्यवहारात गैरप्रकार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र या व्यवहारात एक रुपयाची देखील आर्थिक देवाणघेवाण झालेली नसल्याचा दावा स्वतः अजित पवारांनी केला आहे. तर संबंधित जमिनीबाबत झालेला व्यवहार रद्द करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे. आज दमानिया पुण्यातील मुंडवा येथील वादग्रस्त जमिनीची पाहणी करण्यासाठी गेल्या असता त्यांना त्या ठिकाणी दाखल होण्यापासूनच रोखले गेले. यानंतर संतप्त झालेल्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याचबरोबर उद्या पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया-
अंजली दमानिया म्हणाल्या की, मी माहिती घ्यायला जागेवर गेले. परवानगी नसेल तर आत सोडता येणार नसल्याचे बोटॅनिकल सर्व्हेचे अधिकारी म्हणले. ते उद्धट होते. आम्हाला दोन जणांना जाऊ द्या, पाहणी करू द्या, ही परवानगी देखील त्यांनी नाकारली. कोणाचे फोन आल्यावर त्यांनी याला नकार दिला हे काही माहित नाही. पुढे त्या म्हणतात सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन पत्रकार परिषद घेईल. मुठे समितीचा अहवाल देखील आज येणार आहे. कोणताही अहवाल आला की, कोणतीही समिती अस म्हणूच शकत नाही, कि हे कायदेशीर झाले आहे. १६ जूनला इथे काही माणसांनी आत जाऊन तमाशे केले होते. ती मानस नक्की कोण होती? याची माहिती घ्यायची होती. मात्र, त्यांनी मला परवानगी नाकारली आणि अधिकारी अतिशय उद्धट होते. त्या पुढे म्हणतात अजित पवार हा व्यवहार रद्द करणारे कोण? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा. दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर व्यवहार परस्पर रद्द करण्याचा अधिकार त्यांना नाही. हा व्यवहार पंतप्रधान मोदी पण रद्द करू शकत नाही, असा दावा त्यांनी केला. क्रिमिनल लायबिलिटी तपासत नाही, तोपर्यंत हा व्यवहार रद्द करता येणार नाही. हा व्यवहार रद्द केला तर मी कोर्टात चॅलेंज करिन, असा आक्रमक इशारा देखील अंजली दमानिया यांनी दिला्.
हे देखील वाचा – Karnataka Elephant : कर्नाटकातील मालावल्ली तालुक्यात हत्ती कालव्यात पडला; बचावकार्य सुरू









