Home / महाराष्ट्र / CRZ: सीआरझेडमधील झोपड्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

CRZ: सीआरझेडमधील झोपड्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

CRZ- मुंबईत किनारपट्टी नियमन क्षेत्रामध्ये (CRZ) असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. सीआरझेडमधील ८५ हजार झोपड्यांचे समूह पुनर्विकास...

By: Team Navakal
mumbai zopadpatti
Social + WhatsApp CTA
CRZ- मुंबईत किनारपट्टी नियमन क्षेत्रामध्ये (CRZ) असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. सीआरझेडमधील ८५ हजार झोपड्यांचे समूह पुनर्विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) योजने अंतर्गत पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

समूह पुनर्विकास योजने अंतर्गत सीआरझेड झोन - १ आणि झान- २ मधील झोपड्या एकत्र करून त्यांचे अन्य जागी पुनर्वसन करण्यात येणार आहे. मुंबईत एकूण १३ लाख ८० हजार झोपड्या असून त्यापैकी आतापर्यंत केवळ दोन लाख साठ हजार झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित ११ लाख २० हजार झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे काम बाकी आहे. या झोपड्यांपैकी ५ लाख ६७ हजार २६७ झोपड्यांचे पुनर्वसन नियोजित असून ३ लाख २६ हजार ७३३ झोपड्यांच्या पुनर्वसानाचे अद्याप नियोजन करण्यात आलेले नाही. 

दुसरीकडे २ लाख २६ हजार झोपड्यांचे पुनर्वसन केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणामुळे रखडले आहे. या झोपड्यांपैकी १ लाख ४१ हजार झोपड्या केंद्र सरकारच्या जमिनीवर असून त्यापैकी ८५ हजार झोपड्या सीआरझेडमध्ये आहेत. या झोपड्यांच्या पुनर्वसानाबाबत केंद्र सरकारचे ठोस धोरण नाही. त्यामुळे पुनर्वसन रखडले आहे.मात्र आता सीआरझेडमधील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.


हे देखील वाचा –

बिहारात गुरुवारी नवे सरकार उद्या विधानसभा भंग होणार

सुषमा अंधारेंना हक्कभंग नोटीस

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या