Best Protest – सेवानिवृत्तनंतर ३० दिवसांत ग्रॅच्युइटीचे (Gratuity)पैसे कामगारांना मिळायला हवे होते. मात्र चार वर्षे झाली तरी बेस्ट (Brihanmumbai Electric Supply and Transport) उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची ग्रॅच्युइटी रक्कम मिळालेली नाही. हा ग्रॅच्युइटीची पैसे लवकरात लवकर मिळावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने (Retired Employe Association) दिला आहे. ४,५०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचे पैसे देण्यासाठी सुमारे ७०० कोटींची गरज भासणार आहे.
बेस्ट उपक्रमावर आधीच आर्थिक भार असल्याने बेस्ट उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची देणी देण्यात अडचणी येत आहेत. परंतु सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी लवकरात लवकर देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आर्थिक कोंडीत अडकलेल्या बेस्ट उपक्रमाला दररोज नवनवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे. बँकांकडून कर्ज देण्यास चालढकल केली जात आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमात सध्या कार्यरत २६ हजार अधिकारी व कर्मचारी यांना वेळेवर वेतन देणे शक्य होत नाही. त्यात ४ हजारांहून अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीपोटी ७०० कोटी रुपये देणे आहे.
२०२२ पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचे पैसे देणे प्रलंबित असून लवकरात लवकर पैसे न मिळाल्यास आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने दिला आहे.
हे देखील वाचा –
राम मंदिराचे काम पूर्ण झाले; मोदी धर्मध्वज फडवकणार
एलआयसीवर केंद्राचा दबाव; अदानीत अब्जावधीची गुंतवणूक
कोणाच्याही टेकू शिवाय ठाकरे बंधूंचाच महापौर ! संजय राऊतांचा दावा









