नवी दिल्ली –कोल्हापूरच्या जैन मठातील (Jain Math) हत्तीण माधुरी (Madhuri)उर्फ महादेवी हिची नीट काळजी घेतली जात नसल्यामुळे तिची रवानगी जामनगरला करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिला होता. या आदेशाच्या विरोधात जैन मठाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका (petition)दाखल केली आहे.
कोल्हापूरच्या जैन मठात महादेवी नावाची एक ३६ वर्षांची हत्तीण होती. या हत्तीणीची नीट काळजी न घेतल्याबद्दल तिची गुजरातमधील जामनगर (Jamnagar in Gujarat.) येथील राधेकृष्ण मंदिर हत्ती पुर्नवसन केंद्रात रवानगी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या संदर्भात मठाचे व्यवस्थापक सागर सांभूशेट्टे यांनी म्हटले आहे की, या हत्तीणीबरोबर आमच्या भावना व श्रद्धा जुळलेल्या आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
महादेवी उर्फ माधुरी नावाची ही हत्तीण १९९२ पासून कोल्हापूरच्या जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्था या मठाकडे होती. या हत्तीणीची नीट काळजी घेतली जात नसल्याची तक्रार पेटाने केली होती. त्याची चौकशी करण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली. समितीने २०२३ मध्ये या हत्तीणीला गुजरातला पाठवण्याची शिफारस केली. या विरोधात मठाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयानेही या हत्तीणीची गुजरातला रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यावर आता ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.