Phaltan Doctor Death Case : साताऱ्यातील फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत. बीडमधील एका डॉक्टर महिलेने तळ हातावर सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली होती. यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेच्या नावाचा उल्लेख केला आहे. आता याच पार्शवभूमीवर त्याच्यावर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याचा काहीप्रमाणात हात असल्याचे समोर आल्यानंतर बदनेला पोलीस खात्यातून थेट निलंबित करण्यात आले होते. मात्र आता त्याच्यावर मोठी कारवाई देखील करण्यात आली आहे.
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. बदने सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. फलटण पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच पोलीस दलाची प्रतिमा मालिन केल्याचा ठपका ठेवत त्याला बडतर्फ करण्यात केले आहे.
महल-डकटर-आतमहतय-परकरणत-मठ-करवईया PSI गोपाल बदनेचे अजूनही बरेच कारनामे समोर आले होते. त्याने फक्त मृत महिला डॉक्टरलाच नव्हे तर काही इतर महिलांना देखील त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. PSI बदने हा अनेकदा महिलांची छेड काढायचा असाही धक्कादायक खुलासा आता झाला आहे. त्यामुळे आता त्याच्यावर हि मोठी कारवाई करण्यात आली आहे.
हे देखील वाचा –









