Phaltan Doctor Suicide : अत्याचार आणि आत्महत्या यांची बळी ठरलेल्या साताऱ्यातील डॉक्टर तरुणीपेक्षा जन्मताच मृत्यू येन कधीही चांगलंच. मुली, स्त्रिया यांच्या बाबतीत घडणाऱ्या क्रूरता प्रतवारी करायची तर ती अशीच करावी लागेल. या जगात येऊन कोणाची तरी लाडकी लेक, लाडकी बहीण, लाडकी नात, पुतणी, भाची, मैत्रीण, बायको होऊनही कुणा वासनांधाच्या विकृत मानसिकता असणाऱ्याची शिकार होण्यापेक्षा जन्मण्याच्या आधीच काय तो मृत्यू आलेला कधीही चांगला.
काळजाचा तुकडा असलेल्या लेकीला प्रेमाने, लाडाकोडात वाढवण्याची, शिकवण्याची, हवे ते सगळे मिळवून देण्याची इच्छा बाळगणाऱ्या मायबापाला एके काळी हुंडा नावाच्या छुप्या, पण भयंकर राक्षसाची मोठी दहशत होती. आजघडीला त्याची जागा अत्याचार मारहाण या महाभयंकर अशा विकृत प्रवृत्तीच्या सैतानाने घेतली आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याची भीती बाळगत जगण्यापेक्षा ‘पापा की परी’ जन्माला न आलेलीच बरी, नाही का?
साताऱ्यातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर राज्यभर निर्माण झालेला रोष समाजातील विकृत वृत्तीनं विरोध कारण आशेचा किरण बनतो. देशात कुठेही मग अगदी दिल्ली असो, हैदराबाद असो, कोलकाता असो की उत्तराखंड… कोणत्याही कारणाने घराबाहेर पडणारी स्त्री पुरुषांच्या विकृत क्रूरपणाला सातत्याने बळी पडत असेल तर आपण खरोखर २१ व्या शतकात जगतोय का? दर महिन्याला अश्या घटना घडत असतात राज्याच्या जगाच्या पाठीवर कुठेना कुठे या गोष्टी सातत्याने घडत असतात. या गोष्टी कधी थांबणार नाहीत का? दर काही काळाने कुठे तरी पुन्हा अशी घटना घडली की चीड, उद्विग्नता, हताशा होऊन तीव्र प्रतिक्रिया ऐकायला मिळतात आणि तिच्या जागी आपली लेक नव्हती याचे समाधान मानायचे का?
पण हा मुद्दा केवळ महिलांच्या अत्याचारासंदर्भात सीमित आहे का? तर नाही बऱ्याचदा यात खूप गुंतागुंत असते. बऱ्याचदा तपासाच्या शेवटी याचे धागेदोरे उलगडतात . त्यामुळे सुरवातीला यावर कोणताच ठोस निर्णय देणे प्रशासनाला मंजूर नसते असाच एक गुंतागुंत वाढवणारा आणि अतिशय भयंकर असा प्रकार साताऱ्यात घडला आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका २८वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तरुणीने तळहातावर सुसाईड नोट सुद्धा लिहिली होती. त्या नोटमध्ये ती लिहिते पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेने आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाला आता एक गंभीर स्वरूप मिळाले आहे.
या महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी १९ जून २०२५ रोजी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) यांच्याकडे ४ पानांची लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीत मृत डॉक्टरने काही पोलीस अधिकारी आपल्याला त्रास देत असल्याचा स्पष्ट तिन यात केला होता. पीडित डॉक्टर तरुणीने ३ पोलीस अधिकाऱ्यांची नावे तक्रारीत नमूद केली होती. असा दावा काही वृतांनी केला आहे.यासंदर्भात आंबादास दानवे यांनी देखील एक्स वर पोस्ट करत अधिक माहिती दिली आहे.
हा त्या महिला डॉक्टरचा जबाब! तिला विनाकारण तक्रारी करून छळले गेले. तिला छळणारे अधिकारी कोणाच्या मदतीने पळाले? हा महाडिक आणि अन्य अधिकारी कुठे आहेत, मिस्टर सीएम @Dev_Fadnavis?
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 24, 2025
एरव्ही टाचणी पडली तरी कल्ला करणाऱ्या भाजपच्या महिला नेत्या आज कुठे आहेत? की ही डॉक्टर मराठवाड्याची… pic.twitter.com/BJJHhGrnXy
पोलीस उपअधीक्षकांनी या पत्रावर कोणत्याच प्रकारची कारवाई का केली नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. १९ जून रोजी तक्रार दाखल होऊनसुद्धा पोलीस उपअधीक्षकांनी या पत्राची आणि तक्रारीची दखल का घेतली नाही? खरच हा मुद्धा इतका लहान वाटलं म्हणून पोलिसांकढुन यावर कोणत्याच प्रकारची ऍक्शन घेतली नाही का? वेळीच या तक्रारीवर कारवाई करण्यात आली असती, तर कदाचित आज ती तरुणी आपल्यात असती ही दुर्दैवी घटना टाळता आली असती, असे आता बोलले जात आहे.
फलटण येथील डॉक्टर तरूणी आत्महत्या (Phaltan Doctor death case) प्रकरणी आता एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत बनकर या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, या घटनेनंतर पोलिसांची पथके दोन आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती.
युवतीने तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याने मानसिक आणि शारीरिक छळ (Phaltan Doctor death case)केल्याची माहिती नमूद केली होती. याप्रकरणी फलटण येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या (Phaltan Doctor death case) प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
प्रशांत बनकर या आरोपीला सातारा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेनंतर पोलिसांची पथके दोन आरोपींच्या मागावर रवाना केली होती. प्रशांत बनकरला आज पहाटे चार वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. या विकृत नराधम मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसला होता. या सगळ्या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतर या प्रकरणातील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणातील आणखी एक पोलीस असलेला आरोपी सध्या फरार आहे. त्याला अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेतली असून, संबंधित जबाबदार असलेल्या पोलिसांना तत्काळ निलंबित करावे, असे निर्देश देखील त्यांनी पोलिसांना दिले. त्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने या नराधमाला तत्काळ निलंबित केले आहे. तो अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे.
माझ्या भावाला तिने प्रेमाची मागणी घातली होती- आरोपीची बहीण
प्रशांत बनकर या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आणि आता त्याच्या कुटुंबीयांनि यावर यावरती प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीच्या भावाने यावर प्रतिक्रिया दिली आहे माझ्या भावाने स्वतः सरेंडर केलं आहे. पुढे तो सांगोत काल साकळपासून त्याच्या वडलांना पोलीस स्टेशनंमध्ये बसवून ठेवलं होत. कारण प्रशांत बनकर हा सापडत नव्हता. यानंतर त्याच्या बहिणीने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.त्याच्या बहिणीने माध्यमांना यावरती प्रतिक्रिया दिली आहे. त्याची बहीण म्हणते डॉक्टर तरुणीचे आणि माझे खूप चांगले नाते संभंध होते. पुढे ती सांगते संपदा मुंडे आत्महत्या केलेली महिला सतत तणावात असायची. पुढे ती सांगते डॉक्टर तरुणीने माझ्या भावाला मेसेज द्वारे प्रेमाची कबुली दिली होती. त्यावर प्रशांत बनकर याने स्पष्टपणे नकार देखील दिला.

पुढे त्याची बहीण सांगते कि आमच्या दोन्ही घरत चांगले संभंध होते तरीही तिने माझ्या भावाचं नाव का घेतलं असा प्रश्न देखील आरोपीच्या बहिणी विचारला आहे. या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालं असून पोलिसा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
हे देखील वाचा – Xiaomi 55 Inch TV: 55 इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही फक्त ₹14,000 मध्ये, ऑफर स्टॉक संपेपर्यंत; पाहा डिटेल्स









