PM Modi On Sanjay Raut Health : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज गंभीर आरोग्य समस्यांमुळे सार्वजनिक जीवनातून तात्पुरती विश्रांती घेण्याची घोषणा केली. राऊत यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या आजाराबद्दल त्यांच्या समर्थकांना माहिती दिली आणि खुलासा केला आहे. त्यांची प्रकृती अचानक बिघडली आहे आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांना सध्या बाहेर न पडण्याचा किंवा लोकांमध्ये मिसळू नये असा सल्ला दिला आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 31, 2025
एक्सवर त्यांनी याबाबत पोस्ट टाकली आहे ज्यामध्ये त्यांना त्यांच्या आजारपणाबद्दल माहिती देण्यात आली. त्यांनी विश्वास व्यक्त केला की ते लवकरच बरे होतील आणि सक्रिय राजकीय जीवनात परत येतील.
“तुम्ही सर्वांनी नेहमीच माझ्यावर विश्वास आणि प्रेम दाखवले आहे, ज्यासाठी मी आभारी आहे. तथापि, अलिकडेच मला काही गंभीर आरोग्य समस्या आल्या आहेत. उपचार सुरू आहेत आणि मी लवकरच बरा होईन आणि परत येईन,” असे ते म्हणाले.
Praying for your speedy recovery and good health, Sanjay Raut Ji.@rautsanjay61 https://t.co/nGgRFO4AhS
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2025
यानंतर पंतप्रधान मोदींनी यावर प्रतिक्रिया देईल आहे. याबाबत एक्स वर पोस्ट करत त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी शुभेच्छा यावेळी पंतप्रधानांनी दिल्या आहेत. ते म्हणतात “संजय राऊत जी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि उत्तम आरोग्य लाभो,” असे पंतप्रधान मोदींनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
हे देखील वाचा –
Aligarh Temple : अलीगढच्या मंदिरावर हिंदूंनीच ‘आय लव्ह मोहंमद ‘ लिहिले
 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								








