Gautami Patil Accident case -पुण्यात गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) वाहनच ३० सप्टेंबर रोजी अपघात झाला होता. एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ गौतमीच्या गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील दोन व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील समोर आली आहे. एवढा मोठा अपघात ( Accident) झालेला असूनसुद्धा गौतमी पाटील किंवा तिच्या टीम कडून ठोस अस स्पष्टीकरण देण्यात आलं न्हवत. किंवा कोणत्याही प्रकारचा माफीनामासुद्धा देण्यात आला न्हवता. असा दावा रिक्षाचालकांच्या (Auto driver) कुटुंबियांकडून करण्यात येत होता. याबाबत पोलिसही (police)सहकार्य करत नसल्याचा गंभीर आरोप देखील कुटुंबीयांनी केला होता.
या प्रकरणात गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी गेले काही दिवस होत होती. प्रत्यक्षात गौतमी पाटील गाडीमध्ये होती की नाही? याबाबतही संभ्रम होता.या प्रकरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलिसांना (police) कारवाई करण्यासाठी फोन केल्याचा व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर चांगला वायरल होत होता.
अपघातावेळी गौतमी पाटील वाहनात नव्हतीच, अशी माहिती देखील पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. याकरता पुणे पोलिसांनी १०० हुन अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते. त्यामुळे अपघातावेळी फक्त गौतमी पाटीलचा चालक वाहनात उपस्थितीत होता.. या सगळ्या गोष्टीना केंद्रबिंदू करत आता एक मोठी घडामोड समोर आली आहे. गौतमी पाटीलला पुणे पोलिसांनी क्लीन चीट दिली असल्याची महत्वपूर्ण माहित आता समोर आली आहे.
हे देखील वाचा –
महायुती सरकारची आणखीन एक योजना बंद?रोहित पवारांचा सरकारवर घणाघात