केम छो बारवर कारवाई; पोलीस अधिकाऱ्याची बदली

Kem Chho Bar mirarod

मीरा रोड- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत (Mumbai-Ahmedabad National Highway) काशिमीरा पोलीस (Kashmir Police) ठाण्याच्या हद्दीत असलेल्या केम छो बारमधील (Kem Chho Bar) अनैतिक कारवायांवर पोलीस (Police) आणि पालिका प्रशासनाने ४ ऑगस्ट रोजी कारवाई केली. या कारवाईत बारमधील गुप्त दरवाजे, अरुंद बोळ, कॅव्हिटी रूम (Cavity Room)आणि अलार्म सिग्नल (alarm signal)यांचा पर्दाफाश करत उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई भाईंदर विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. मात्र, या धाडसी कारवाईनंतर लगेचच काल रात्री त्यांच्या बदलीचे आदेश निघाले, ज्यामुळे पोलीस दलात आश्चर्य आणि संभ्रम निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, केम छो हा बार काशिमीरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असूनही, स्थानिक अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. मात्र, देविदास हंडोयांनी ती कारवाई केली. परंतु त्यांचीच बदली करण्यात आली. दुसरीकडे निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, हे पोलीस प्रशासनाच्या नैतिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे, अशी प्रतिक्रिया रहिवासी व्यक्त करत आहेत.