Pothole Accident : महाराष्ट्रात कुठला असता रास्ता आहे ज्यात खड्डे नाहीत. आणि रस्त्यावर खड्डे असंन म्हणजे जणू काही परंपराच असल्यासारखं वाटतात. पण या खाड्यांमुळे होणारे मृत्यू अपघात हे वास्तवाचं सांगणार कटू सत्य आहे. अहिल्यानगर ते मनमाड महामार्गाची पुरती वाट लागली आहे, दररोज निष्पाप लोकांचे अपघातामध्ये हकनाक बळी जात आहे. दुचाकीवरून प्रवास करत असताना दुचाकी खड्ड्यात गेल्याने दुचाकीवरील तरुण बाजूला पडला आणि त्याच्या अंगावरून अज्ञात वाहन गेले.
या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोपरगाव शहराजवळील येवला नाका येथील बजाज शोरूम या ठिकाणी घडली आहे. या तरुणाच्या मृत्यूनंतर तेथील नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला. संतप्त झालेल्या नागरिकांनी आज बुधवारी घटनास्थळी जात रास्ता रोको आंदोलन करीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करून तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.

आदित्य कैलास देवकर असे या मृत तरुणाचे नाव असून वय २८ आहे. आदित्य याचा मंगळवारी रात्री बळी गेल्यानंतर आज बुधवारी सकाळी संतप्त नागरिकांनी घटनास्थळी जाऊन रास्ता रोको करत जोरदार आंदोलन केले. अपघातास कारणीभूत बांधकाम विभागाचे अधिकारी असून, त्यांच्यावर मनुष्यवधासारखा गंभीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. या रास्ता रोकोमुळे नगर-मनमाड रस्त्यावर वाहतूक बराच काळ खोळंबली होती.
नगर-मनमाड महामार्गावर जवळजवळ सर्वच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहे. हा महामार्ग जणू मृत्यूचा सापळा आहे कि काय असे वाटू लागले आहे. त्याचबरोबर रस्त्यावर कोणत्याही प्रकारची प्रकाशव्यवस्था नसल्याने वाहनचालकांना रस्ता ओळखणे कठीण होऊन बसलं आहे. अनेक प्रवाशांचा या महामार्गावर बळी जातोय. तरीही संबंधित विभाग आणि प्रशासनाकडून रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यात येत नसल्याबद्दल नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा – Genocide unfolding in Sudan : सुदानमध्ये युद्ध चिघळले ; ४८ तासांत २००० हुन अधिक नागरिकांची हत्या..









