Powai Children Hostage News : मुंबईमधील पवई येथे एका इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चांदिवली येथील रॉ स्टुडिओ नावाच्या एका बंदिस्त इमारतीत आरोपीने १५ वर्षांखालील एकूण १७ मुलांना डांबून ठेवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पवई पोलीस, साकीनाका पोलीस व अग्निशमन दल या मुलांची सुखरूप सुटका करण्यात यशस्वी झाले आहे.
एका प्रत्यक्षदर्शीने देखील यावरची अधिक माहिती सांगितली आहे. ते सांगतात “अभिनय कार्यशाळेच्या नावाखाली या मुलांना रॉ स्टुडिओत बोलावून आरोपीने त्यांना बंदिस्त करून ठेवलं होत.तसेच ६ दिवसापासून हि मूल ऑडिशनसाठी जात होती. आज दुपारी हि मूल जेवणासाठी देखील बाहेर आली नाहीत
त्यामुळे त्या सगळ्या मुलांचे पालक स्टुडियोजवळ जमले. त्याचवेळी काही मुलं स्टुडिओच्या काचेच्या खिडकीतून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करत होते आणि मदत मागण्याचा प्रयत्न करताना दिसली. त्यानंतर मोठा गोंधळ उडाला. आणि आजूबाजूचे लोक जमले.”

नेमकं प्रकरण काय ?
प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याप्रमाणे “स्थानिकांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिल्यानंतर पवई पोलीस आणि साकीनाका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला दरवाजा उघडण्यास सांगितलं. मात्र, आरोपीने त्याच्याकडे बंदूक व ज्वलनशील पदार्थ असलयाचे सांगितले जर कोणीही आत येण्याचा, दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर मी हा स्टुडिओ पेटवून देईन अशी धमकी देखील दिली. त्यानंतर बराच वेळ पोलीस आरोपीला सामंजस्याने सांगायचं प्रयत्न केला. दरम्यान, दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व मुलांना सुखपूर बाहेर काढलं असून पोलिसांनी आरोपी रोहित आर्य याला ताब्यात घेतलं होत.
या आरोपीचं नाव रोहित आर्य असं असून या आरोपीने कारवाई दरम्यान पोलिसांवर गोळीबार केला होता. पोलिसांनी केलेल्या बॅक फायरिंग अर्थात गोळीबारात रोहित आर्य हा जखमी झाला होता. या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला असून पोलीस या बद्दलचा अधिक तपस करत आहेत. पोलिसांनी या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. पोलिसांनी रॉ स्टुडिओत बाथरूममधून प्रवेश करत रोहित आर्य या व्यक्तीला ताब्यात घेतले होत. यावेळी १७ मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून यात एक वृद्ध नागरिक तसेच अजून एका व्यक्तीला बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
रोहित आर्यने मुलांना डांबून का ठेवलं?
रोहित आर्यने मुलाना डांबून ठेवलं होतं तेव्हा एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात त्याने म्हटलं होतं की “मला या मुलांना काहीच करायचं नाही आहे. मात्र मला काही माणसांशी बोलाचं आहे, चर्चा करायची आहे, माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळवायची आहेत. मला कोणी रोखण्याचा, इथे येण्याचा प्रयत्न केला तर या मुलांबरोबर काही वाईट घडलं तर त्याला मी जबाबदार नाही.” या आरोपीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला असून या बाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे देखील वाचा –
Rohit Pawar in Trump Aadhaar Case : रोहित पवारांवर डोनाल्ड ट्रम्पच्या बनावट आधारकार्ड प्रकरणी गुन्हा









