Pradnya Satav : राज्य निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक महत्वपूर्ण बदल होताना दिसत आहेत. यात आपसात युती, किंवा मग एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश यासगळ्या घडामोडीनां वेग आला आहे. आणि आता अशातच काँग्रेसचे स्वर्गीय नेते राजीव सातव(Rajiv Satav)यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला होता त्यांनी आपला राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सादर केला. आणि त्यांनी आजच तात्काळ जाहीरपणे भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता काँग्रेसला भाजपने तगडा झटका दिला असल्याचे दिसत आहे.
गेल्या काही काळापासून प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगात होती. आज त्यांच्या पक्षप्रवेश नंतर या चर्चाना पूर्णविराम लागला आहे. याशिवाय असे देखील बोलले जात आहे कि पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी देखील दिली होती. राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय देखील मानले जात होते. मात्र,कोरोनामध्ये त्यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. प्रज्ञा सातव या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी आपल्या समर्थकांसह आल्या आहेत. हिंगोलीतून आलेल्या कार्यकर्त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील केली.आणि त्यांनी आता अखेर भाजपात प्रवेश केला आहे.
नक्की कोण आहेत प्रज्ञा सातव? (Who Is Pradnya Satav)
डॉ. प्रज्ञा सातव या हिंगोलीचे काँग्रेसचे माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर स्वत:चे स्थान बळकट केले. ते राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून देखील ओळखले जायचे. २०१४ च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा देखील समावेश होता. त्यानंतर मात्र राजीव सातव प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर राजीव सातव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात स्वत:चे स्थान बळकट केले. राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून देखील काम केले होते. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदे त्यांनी भुषविली होती.
राजीव सातव हे २०१४ ते २०१९ दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांचं २०२१ मध्ये आजारपणामुळे दुर्दैवी निधन झाले. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या विधान परिषदेच्या आमदार देखील आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर २०२१ साली विधानपरिषदेवर बिनविरोधी त्यांची निवड झाली होती. प्रज्ञा सातव या पहिल्यांदा २०२१ मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर त्या निवडून आल्या होत्या..
हे देखील वाचा – Sanjay Raut : एकनाथ शिंदेंचं मुंबईच बजेट १० हजार कोटी संजय राऊतांचा मोठा आरोप; उमेदवाराला लढण्यासाठी १० कोटी रुपये दिल्याचा दावा..









