Home / महाराष्ट्र / Praful Patel Viral Video : अजित पवारांच्या शोक सभेतील प्रफुल्ल पटेलांचा तो विडिओ व्हायरल.. नेटकरी म्हणाले “खरंच दुःख झालंय का?…..

Praful Patel Viral Video : अजित पवारांच्या शोक सभेतील प्रफुल्ल पटेलांचा तो विडिओ व्हायरल.. नेटकरी म्हणाले “खरंच दुःख झालंय का?…..

Praful Patel Viral Video : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेचा कार्यक्रम मुंबईतील वरळी डोम येथे पार पडला. त्याप्रसंगी...

By: Team Navakal
Praful Patel Viral Video
Social + WhatsApp CTA

Praful Patel Viral Video : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेचा कार्यक्रम मुंबईतील वरळी डोम येथे पार पडला. त्याप्रसंगी देशातील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते, उद्योगपती उपस्थित होते. या सर्वांनी अजितदादांना आदरांजली वाहिली.

अजितदादांच्या शोकसभेसाठी माजी सरन्यायाधीश भूषण गवई, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनीही उपस्थिती लावली. यादरम्यान, एका बाजूला उद्योगपती मुकेश अंबानी, दुसऱ्या बाजूला उद्योगपती गौतम अदानी आणि मध्यभागी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल बसल्याचं दिसून आलं.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि उद्योगपती मुकेश अंबानी, उद्योगपती गौतम अदानी यांचा आजूबाजूला बसलेला एक विडिओ सोशल मीडियावर झपाटयाने व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये प्रफुल पटेल आणि मुकेश अंबानी हे अजित पवारांच्या शोकसभेत हसून खिदळून बोलताना दिसत आहेत. अजित दादांना जाऊन एक महिना देखील झाला नाही आणि प्रफुल पटेलांच्या या व्हिडिओमुळे त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर नेटकाऱ्यानी हा विडिओ पोस्ट करत त्याला तितकच सटीक असं कॅप्सशन देखील दिल आहे. एका नेटकाऱ्याने लिहले कि ही शोकसभा आहे…?? खरचं…?? इथं आमचा अजित दादांशी कसलाही संबंध नसतानाही दादांमुळे नकळत डोळ्यात पाणी येतय…ही लोकं तर एवढ्या जवळची…तरीही दात काढता आहेत…?? असं कॅप्सशन देत हा विडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या घटनेवर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अत्यंत धारदार शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

अंजली दमानिया यांचा जळजळीत सवाल-
वरळी येथील शोकसभेत घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ ‘एक्सवर पोस्ट करत अंजली दमानिया यांनी नेत्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या या पोस्टमुळे या वादाला आता अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले असून, राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.

त्या म्हणतात “हे अजित पवारांचे वर्षानुवर्षांचे सोबती असू शकतात का? या व्यक्तींना अजितदादांच्या जाण्याने खरोखरच दुःख झाले आहे, असे या दृश्यांकडे पाहून किंचित तरी वाटते का?”

अशा मर्मावर बोट ठेवणाऱ्या शब्दांत त्यांनी पटेलांच्या भूमिकेवर टीका केली आहे. शोकसभेसारख्या अत्यंत गंभीर प्रसंगी, जिथे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे, तिथे अशा प्रकारचे हास्यविनोद होणे हे निंदनीय असल्याचे त्या म्हणाल्या.

या सर्व प्रकारामुळे प्रफुल्ल पटेल यांच्यावर सर्वच स्तरांतून टीकेचा प्रचंड वर्षाव होत आहे. अजितदादांसारख्या झंझावाती नेतृत्वाला निरोप देण्याच्या प्रसंगी किमान सभ्यता आणि गांभीर्य राखणे ही नैतिक जबाबदारी होती, जिथे प्रफुल्ल पटेल साफ अपयशी ठरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या एका व्हिडिओमुळे आणि त्यातील त्यांच्या विसंगत देहबोलीमुळे राजकीय वर्तुळातून आणि जनमानसातून त्यांच्या निष्ठेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारे हे वर्तन असून, या घटनेने अजितदादांच्या चाहत्यांच्या भावनांना मोठी ठेच पोहोचली आहे, हे मात्र निश्चित.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या