राज्यभरात प्रहार संघटनेचे कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन

Prahar's state-wide strike demanding loan waiver

मुंबई – राज्य सरकार (state government) उद्योगपतींवर मेहरबान आहे , त्यांना शेतकऱ्यांशी देणेघेणे नाही असा हल्लबोल प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू (Prahar Janshakti Party chief Bachchu Kadu)यांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांच्या प्रहार संघटनेने (Prahar) आज राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात तअमरावती (Amravati), नागपूर, पुणे, वसई, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), चंद्रपूर, नाशिक, येवला (Yeola), अकोले या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आक्रमक भूमिका मांडली.


बच्चू कडू यांच्या आवाहनानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी (Prahar activists) राज्यभरात प्रमुख महामार्ग रोखून धरले. अमरावती-नागपूर (Amravati–Nagpur highway,)महामार्गावरही तीव्र आंदोलन (protest)केले, ज्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. काही ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे पत्त्यांचे चित्र असलेले पोस्टर हातात घेऊन तर काही ठिकाणी रस्त्यावर पत्त्याचा डाव मांडून त्यांच्या वादग्रस्त भूमिकेवर टीका केली.

या आंदोलनात प्रहारसोबतच अनेक समविचारी पक्ष आणि संघटनांनीही सहभाग घेतला. या आंदोलनाद्वारे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट आणि तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा आणि दिव्यांग बांधव, शेतमजूर आणि मेंढपाळ समाजाच्या प्रलंबित प्रश्न सोडवावेत अशी मागणी केली. शेतकरी, दिव्यांग, शेतमजूर आणि मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.


बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हमीभावावर सरकार बोलायला तयार नाही. केवळ समित्या स्थापन करण्याचे नाटक केले जाते. समिती स्थापन झाल्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही.शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. आमची गांधीगिरी आता संपली आहे , भगतसिंगगिरी सुरू झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांना (farmers)सरसकट कर्जमाफी दिली नाही, तर आमचे पुढचे आंदोलन थेट मंत्रालयावर धडकेल.