Home / महाराष्ट्र / Prakash Surve : शिंदेंच्या शिवसेना आमदाराचं आक्षेपार्ह वक्तव्य..

Prakash Surve : शिंदेंच्या शिवसेना आमदाराचं आक्षेपार्ह वक्तव्य..

Prakash Surve : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मराठी माझी आई आहे...

By: Team Navakal
Prakash Surve
Social + WhatsApp CTA

Prakash Surve : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मराठी माझी आई आहे आणि उत्तर भारत माझी मावशी आहे. एक वेळ आई मेली तरी चालेल पण माझी मावशी जिवंत राहिली पाहिजे असं अविचारी विधान त्यांनी केलं आहे. एका सभेत बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं असून, यावरुन आता मोठा वाद निर्माण झाला आहे.

“मराठी माझी मातृभूमी आणि आई आहे. आणि उत्तर भारत माझी मावशी आहे. एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी मरता कामा नये. कारण मावशी जास्त प्रेम करते. आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही मला दिलं आहे. हेच प्रेम माझ्या सहकाऱ्यांवरही कायम ठेवा”, असं प्रकाश सुर्वे यांनी म्हटलं आहे.

विरोधकांची सडकून टीका-
त्यांच्या या वक्तव्यावर आता किशोरी पेडणेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “२०२२ ला आईलाच नमस्कार करुन सुर्वे बाहेर पडले. त्यांना आई, माता यामधील फरक कळतो कि नाही? मतांच्या लाचारीसाठा वाटेल त्या थराला जाणारी लोक एकनाथ शिंदेंसोबत आहेत. आई मेली तरी चालेल, मावशी जगली पाहिजे ही एक म्हण आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे मतांसाठी लाचारी कोण करत आहे हे दिसत आहे. तुम्ही बाळासाहेबांचे कोणते विचार घेतले आहेत असा सवाल देखील त्यांनी विचारला. त्यांनी कधी आईचा अपमान करा आणि आईला रामराम करा असं शिकवलं नाही. अशा तीव्र शब्दात त्यांनी प्रकाश सुर्वेना खडे बोल सुनावले आहेत.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी देखील त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणतात “त्यांना जास्त माहिती नसल्याने ते काही तरी बरळले असतील. त्यांचं ज्ञान कितपत आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


हे देखील वाचा –

Superfood Combinations : रोजच्या आहारात ह्या पदार्थांच संयोजन करून पहाच..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या