Pranit More : बिग बॉस १९ च्या घरात पुन्हा एका प्रणित मोरेची रीन्ट्री झाली आहे. या संदर्भातील प्रोमो देखेल चॅनेलवर प्रसारित करण्यात आला आहे.. त्याच्या या एंट्रीने त्याचे चाहते मात्र भलतेच खुश झालेलेलं दिसून येत आहेत.. जेव्हा आरोग्याच्या कारणांवरून प्रणितला घरा बाहेरचा रस्ता दाखवला होता तेव्हा त्याचे चाहते मात्र प्रचंड नाराज झाले होते. एक्सवर या बद्दल तॊ ट्रेंड देखील करत होता.. पण आता प्रणित मोरेची घरात परत रीएन्ट्री करण्यात आली आहे.
या आधीच्या भागात तुम्ही पाहायला असेल अशनूर प्रणित अभिषेक मस्ती करत होते तेव्हा एकादा स्टोर रूम मध्ये एका खाणात जाऊन लपला होता आता असाच पद्धतीने त्याची पुन्हा घरात एन्ट्री होणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. मागच्या आठवड्यात प्रणित मोरे कॅप्टन बनला होता मात्र त्याला ते सुख उपभोगता आले नाही.. पण तरीही त्याच्या परत येण्यानेच त्याचे चाहते खुश झाल्याचे दिसून येत आहे.
अनेक सेलिब्रिटिनी देखील प्रणितला पाठिंबा दिला आहे.. या व्यतिरिक्त प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे कि जेव्हा स्टोर रूमची बेल वाजते तेव्हा नीलम गिरी धावत जाते तिला तिथे कोणी तरी असल्याचा भास होतो आणि त्यानंतर सगळेच स्टोर रूम कडे धावतात.. आणि मग प्रणित मोरे बाहेर येतो अश्या प्रकारचा प्रोमो आता सोशल मीडियावर चांगलाच गजतांना दिसत आहे.
हे देखील वाचा – Orange Benefits : तंदुरुस्त राहायचं असेल तर रोज एक तरी संत्र नक्की खा; जाणून घ्या संत्र खायचे फायदे.









