Pro-Govinda League : प्रो गोविंदा लीगच्या ट्रॉफीचे क्रिस गेलच्या हस्ते अनावरण

Pro-Govinda League Trophy Unveiled by Chris Gayle

मुंबई – वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज क्रिकेटपटू क्रिस गेल (west indies cricketer chris gayle)यांच्या हस्ते आज प्रो-गोविंदा लीग – ३ या (Pro-Govinda League – Season 3)स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण मिरा भाईंदरमध्ये करण्यात आले. क्रिस गेल या स्पर्धेचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असून त्यांनी घेऊन टाक मुंबई असे म्हणत गोविंदा पथकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रताप सरनाईकांचे (Pratap Sarnaik.)पुत्र पूर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांनी प्रो-गोविंदाचे आयोजन केले आहे. गुरुवार ७, शुक्रवार ८ आणि शनिवार ९ ऑगस्ट रोजी वरळीमधील डोम (Dome)येथे प्रो गोविंदाची स्पर्धा रंगणार आहे.

यंदा स्पर्धेत देशभरातील १६ संघ सहभागी झाले आहेत. त्यामध्ये बँगलोर ब्लेझर्स, लखनऊ पँथर्स, वाराणसी महादेव असेंडर्स, गोवा सरफर्स, शूर मुंबईकर, नवी मुंबई स्ट्रायकर्स, ठाणे टायगर्स, नाशिक रेंजर्स, नागपूर निंजास, हैदराबाद डायनॅमोस, दिल्ली इगल्स, मीरा-भाईंदर लायन्स, जयपूर किंग्स, मुंबई फालकन्स, अलिबाग नाईट्स या १६ गोविंदा पथकांचा (Govinda teams i) यांचा समावेश आहे.क्रिस गेल म्हणाले, भारतीय संस्कृती, खेळ आणि परंपरा मला नेहमीच आकर्षित करतात. त्यामुळे मी भारतात पुन्हा पुन्हा येतो.