Home / महाराष्ट्र / पुणे-नाशिक सेमी हाय-स्पीड रेल्वेचा ‘डीपीआर’ पूर्ण, 16,000 कोटींच्या प्रकल्पाला गती

पुणे-नाशिक सेमी हाय-स्पीड रेल्वेचा ‘डीपीआर’ पूर्ण, 16,000 कोटींच्या प्रकल्पाला गती

Pune Nashik Semi High-Speed Railway | मध्य रेल्वेने पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक (Pune Nashik Railway) सेमी हाय-स्पीड रेल्वे (Semi High-Speed Rail) कॉरिडॉरचा सविस्तर...

By: Team Navakal
Pune Nashik Semi High-Speed Railway

Pune Nashik Semi High-Speed Railway | मध्य रेल्वेने पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक (Pune Nashik Railway) सेमी हाय-स्पीड रेल्वे (Semi High-Speed Rail) कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) अंतिम केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानुसार हा अहवाल तयार करून एका आठवड्यात रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला जाईल.

जुन्नरमधील GMRT प्रकल्पाला संरक्षण देण्यासाठी मध्य रेल्वेने नवीन मार्गिका सुचवली आहे. पुणे ते अहिल्यानगर 125 किलोमीटर आणि शिर्डी ते नाशिक 82 किलोमीटरचा हा मार्ग सध्या महामार्गाला समांतर धावेल, तर काही भागात बोगदे असतील. यामुळे प्रवासाचा वेळ 45 मिनिटांनी वाढू शकतो, पण मोठा अडथळा येणार नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या 235 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरमध्ये 24 स्थानके असतील, ज्यात 13 प्रमुख आणि 11 लहान थांबे समाविष्ट आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माहिती देताना सांगितले की, हा प्रकल्प जमीनमालकांना त्रास न देता औद्योगिक आणि कृषी वाहतुकीसाठी उपयुक्त ठरेल.

प्रकल्पाचा अंदाजित खर्च 16,000 कोटी रुपये असून, गती 200 किलोमीटर प्रतितास असेल. साडेतीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. रेल्वेमंत्र्यांनी GMRT ला धोका नको, यासाठी नवीन डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिले होते.

डीपीआरमधील दुरुस्त्या अंतिम टप्प्यात आहेत. हा प्रकल्प पुणे, अहिल्यानगर, शिर्डी आणि नाशिकमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या