Home / महाराष्ट्र / Pune Crime News : पत्नीने गळा आवळून केला पतीचा खून..

Pune Crime News : पत्नीने गळा आवळून केला पतीचा खून..

Pune Crime News : पिंपरी चिंचवडमध्ये पतीच्या सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पत्नीने त्याची गळा (Pune Crime News) आवळून हत्या केली...

By: Team Navakal
Pune Crime News

Pune Crime News : पिंपरी चिंचवडमध्ये पतीच्या सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पत्नीने त्याची गळा (Pune Crime News) आवळून हत्या केली आहे. नकुल आनंद भोईर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आणि चैताली भोईर असं खून करणाऱ्या पत्नीचे (Pune Crime News) नाव आहे. या घटनेमुळे चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे पावणे तीनच्या सुमारास नकुल आणि चैताली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून मोठा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला कि रागाच्या भरात पत्नीने पती (Pune Crime News) नकुलचा गळा आवळून खून केला.(Pune Crime News)

या दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षांची दोन लहान मुले देखील आहेत. पतीची हत्या केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलीस देखील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मृत नकुल भोईरचा सामाजिक कार्यामध्ये बराच मोठा वाटा होता, मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमामध्ये तो सक्रिय दिसला. अनेक राजकीय नेत्यांशी सुद्धा त्याचे जवळचे संबंध होते, सामाजिक कार्याचा वारसापुढे चालवण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला नगरसेवक बनवायचे देखील ठरवले होते यासाठी आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तो त्याच्या पत्नीला उमेदवार म्हणून उभे देखील करणार होता.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार, मृत पती हा पत्नीच्या चारित्र्यावरती वारंवार संशय घेत होता. त्यावरून दोघांमध्ये वरचेवर वाद आणि भांडणं होत होती. त्याचा राग मनात धरून पत्नीने पती नकुल भोईर त्याचा गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.


हे देखील वाचा – Kurnool Bus Fire : आंध्र-प्रदेशात बसला भीषण आग; ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग..

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या