Pune Crime : आजवर दोन गटात राडा अश्या बातम्या आपण अनेकदा ऐकल्या असतील. यात मारामारी भांडण एकमेकांच्या जीवावर उठणारी लोक सुद्धा पहिली असतील पण पुण्यात ह्याही पेक्षा धक्कादायक गोष्ट घडली ती म्हणजे पुण्यातील लहानमुलांच्या टोळक्यांमधील गॅंगवॉर. विद्येचं महेर घर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती झपाट्याने वाढताना दिसत आहे. हि घटना खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे घडली आहे. येथील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये शिक्षक शिकवत असतानाच एका विद्यार्थ्याने आपल्याच सोबत शिकणाऱ्या एका मित्राचा गळा चिरून निर्घृण खून केला आहे. (Pune Crime News)
दहावीच्या वर्गात घडलेल्या या खुनाच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांमधील असणाऱ्या गँगवॉरमधून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या आधीक माहितीनुसार, राजगुरूनगर शहरात आज सकाळच्या सुमारास दहावीच्या विद्यार्थ्यांचा खासगी क्लास सुरू होता. वर्गात शिक्षक शिकवत असताना अचानक विद्यार्थ्यांच्या दोन गटांत मोठा वाद निर्माण झाला. याच वेळी रागाच्या भरात एका विद्यार्थ्याने आपल्या बॅगेतून धारदार चाकू काढला आणि बेंचवर बसलेल्या मित्रावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली.
अचानक झालेल्या या विकृत हल्ल्यामुळे वर्गात एकच खळबळ उडाली. जिवाच्या आकांताने हा पीडित विद्यार्थी बचावाखातर वर्गाबाहेर पळाला. मात्र, हल्लेखोर विद्यार्थ्याने या पीडित विध्यार्त्याचा पाठलाग सोडला नाही. त्याने क्लासच्या बाहेरच त्याला पकडले आणि त्याचा गळा चिरला. या हल्ल्यानंतर पीडित विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात तसाच जमिनीवर कोसळला.
ह्या भयंकर प्रकारानंतर आरोपी विद्यार्थ्यंने घटनास्थळावरून आपल्या दुचाकीवरून पळ काढला. दरम्यान, उपस्थित नागरिक आणि क्लासचालकांनी जखमी विद्यार्थ्याला रक्ताच्या थारोळ्यातून उचलत तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, दुप्पट रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या खुणा मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी हजर झाले. हल्ला करणारा विद्यार्थी आणि त्याच्या साथीदाराने स्वतः पोलिस ठाण्यात येऊन केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले आहे.
हे देखील वाचा – SBI FD Rates : तुमच्या FD वर किती व्याज मिळणार? SBI ने स्थिर ठेवींवरील दर घटवले, नवीन दर लागू









