Home / महाराष्ट्र / पोलीस चकमकीत पुण्यातील गुन्हेगार शाहरुख शेख ठार

पोलीस चकमकीत पुण्यातील गुन्हेगार शाहरुख शेख ठार

सोलापूर – सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात काल रात्री उशिरा पुण्यातील शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेखला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी...

By: Team Navakal
Shahrukh Sheikh killed in police encounter

सोलापूर – सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात काल रात्री उशिरा पुण्यातील शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेखला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी (Police) त्याची चकमक झाली. यात शाहरुख शेख ठार झाला. या घटनेवर त्याचे वडील आणि पत्नीने गंभीर आरोप करत गोळीबार शाहरुखने नाही तर पोलिसांनीच केला असा दावा केला आहे.

शाहरुख शेखवर हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ आदी पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात हत्या, खंडणी मागणे, घरफोडी, दरोडा टाकणे अशा स्वरूपाचे १५ हून अधिक गुन्हे दाखल होते. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. पण काही दिवसांपासून तो फरार होता. तो लांबोटी गावात त्याच्या नातेवाईकांकडे लपून बसला आहे अशी माहिती पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) पथकाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुणे गुन्हे शाखेने मोहोळ पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई केली.शेखला पकडण्यासाठी पोलिसांनी घेराव घालताच त्याने आपल्याकडील पिस्तुलाने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी त्वरित प्रत्युत्तरात गोळीबार केला. या चकमकीत शेख गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले , पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.


शाहरुखची पत्नी म्हणाली की, पहाटे साडेतीन वाजता १०-१२ पोलीस घरात घुसले. त्यांना आत घेऊ नको असे शाहरुखने सांगितले. त्याच्याकडे पिस्तूल होते. पण त्याने गोळीबार केला नाही. पोलिसांनी घरात शिरताच चार गोळ्या झाडल्या.
शाहरुखच्या वडील म्हणाले की, त्याच्यावर काही गुन्हे दाखल होते. पण मारहाण प्रकरणात त्याच्यावर खोटा मोक्का लावण्यात आला. तो व्यवस्थित कामाला लागला होता. पण पोलिसांनी त्याला आरोपी केले. पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या